Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुलंही आईपेक्षा मोबाईलच्या सहवासात शांत राहतात हा मातृत्वाचा पराजय:- गणेश शिंदे

आजचा युवकवर्ग बुद्धिमान असला तरीही तो फक्त भौतिक साधनांमध्येच आपले सुख शोधत असून गळलठ्ठ पगार, प्रशस्त बंगला, बाह्य सौंदर्य, म्हणजेच जीवन सुखाने ज

विद्यार्थ्यांनी वेळेच्या व्यवस्थापनाला महत्व द्यावे ः संदीप टुले
अहमदनगर जिल्ह्यात कोरोनामुळे रोज 40 जणांचा मृत्यू!
रेन्बो इंटरनॅशनल स्कूलमध्ये बालिका दिनाचे नेत्रदीपक साजरीकरण

आजचा युवकवर्ग बुद्धिमान असला तरीही तो फक्त भौतिक साधनांमध्येच आपले सुख शोधत असून गळलठ्ठ पगार, प्रशस्त बंगला, बाह्य सौंदर्य, म्हणजेच जीवन सुखाने जगणे नाही.ज्ञानेश्वर माऊलीनी म्हटल्याप्रमाणे आपले मन काय सांगते त्याचे अनुकरण करून आपल्या सुखाचा उपभोग घेणारेच सुंदर जीवन जगतात असे प्रतिपादन सुप्रसिध्द व्याख्याते गणेश शिंदे यांनी केले. 

ते येथील बाबुजी आव्हाड महाविद्यालयात आयोजित तीन दिवसीय बाबुजी आव्हाड स्मृती व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प गुंफताना जीवन सुंदर आहे या विषयावर बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पार्थ विद्या प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष सुरेशराव आव्हाड तर व्यासपीठावर अध्यक्ष अभय आव्हाड, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ जी पी ढाकणे, विवेकानंद विद्या मंदिरचे मुख्याध्यापक शरद मेढे, चैतन्य अर्बन बँकेचे चेअरमन अनंत ढोले, प्रा. रमेश मोरगावकर आदी उपस्थित होते. 

गणेश शिंदे म्हणाले, शिक्षण हे जगणे सुंदर करण्याचे प्रभावी साधन आहे. जीवन सुंदर होण्यासाठी कोणताही फॉर्म्युला परमेश्वराने तयार केला नाही परंतु आयुष्यातील अगदी छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद घेतला तरी जीवन सुंदर होते. माणूस कसा जगला आणि समाजासाठी त्याने काय योगदान दिले यांवर त्याच्या जीवनाची सुंदरता ठरत असते.कोणाचेही अंधानुकरण न करता प्रत्येकाला आपल्यामधील बलस्थाने ओळखता आली पाहिजे. न्यूनगंड मनातून काढून टाकल्यास अपेक्षित ध्येय साध्य करता येते. लढणं व पेटून उठणं इतिहासातून शिकता आलं पाहिजे. आपल्याला ज्या विषयामध्ये आवड आहे त्यामध्ये सर्वोत्तम करण्याचा प्रयत्न केल्यास जीवन निश्चितच सुंदरतेने जगता येते.आज आपला फोन स्मार्ट होत चालला असून दुर्दैवाने आपण बावळट होत चाललो आहोत.लहान मुलांचे डोळे मोबाईलमुळे व्याधीग्रस्त होत असून आईच्या स्पर्शापेक्षा लहान मूल मोबाईलच्या सान्निध्यात शांत राहते हा मातृत्वाचा पराजय आहे असे ते शेवटी म्हणाले. यावेळी अनंत ढोले यांना नाशिक उद्योजकता पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.  प्रमुख पाहुण्यांचा परिचय प्रा. देवेंद्र कराड, सुत्रसंचालन डॉ. अर्जुन केरकळ तर आभार डॉ. प्रशांत साळवे यांनी मानले.

COMMENTS