Homeताज्या बातम्या

हायवाच्या धडकेत महाविद्यालयीन तरुणीचा मृत्यू; दोन मैत्रिणी गंभीर जखमी, छत्रपती संभाजीनगरमधील घटना

छत्रपती संभाजीनगर : शहरातील सातारा परिसरातील धुळे-सोलापूर महामार्गावरील आयआरबी (IRB) पेट्रोल पंपाजवळ झालेल्या भीषण अपघात प्रकरणात एका महाविद्यालय

दक्षिण काशी पुणतांबाच्या विकासाला गती देणार; तीर्थक्षेत्रास ‘ब’ दर्जा देण्यासाठी प्रयत्न करणार – सभापती प्रा. राम शिंदे
चालुक्य वंशजांनी एकाच छत्राखाली यावे; भोर येथील सोनवणे परिवार स्नेह मेळाव्यात दीपक साळुंखे यांचे प्रतिपादन
कर्जतमध्ये बंद बसने उडवला वाहतुकीचा बोजवारा; संतप्त नागरिकांचा एसटी महामंडळाला सवाल
छत्रपती संभाजीनगरमध्ये भीषण अपघात; तिघांचा जागीच दुर्दैवी मृत्यू, २ गंभीर  जखमी | Navarashtra

छत्रपती संभाजीनगर : शहरातील सातारा परिसरातील धुळे-सोलापूर महामार्गावरील आयआरबी (IRB) पेट्रोल पंपाजवळ झालेल्या भीषण अपघात प्रकरणात एका महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा जागीच मृत्यू झाला, तर तिच्या दोन मैत्रिणी गंभीर जखमी झाल्या आहेत. प्रतीक्षा बाबासाहेब सांगवे (वय २१, रा. चाकूर, लातूर) असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या तिन्ही मैत्रिणी महाविद्यालयाचे प्रात्यक्षिक (प्रॅक्टिकल) पूर्ण करून मोपेड दुचाकीवरून घरी जात होत्या. दरम्यान, आयआरबी पेट्रोल पंपाजवळ एका अज्ञात हायवा ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. ही धडक एवढी भीषण होती की, प्रतीक्षा रस्त्यावर पडल्याने तिच्या अंगावरून हायवाचे चाक गेले. यात तिचा दुर्दैवी मृत्यू झाला.

या अपघातात जखमी झालेल्या इतर दोन मैत्रिणींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातानंतर हायवा चालक वाहनसह घटनास्थळावरून पसार झाला असून सातारा पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. तरुणीच्या या अपघाती मृत्यूमुळे चाकूर व संभाजीनगर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

COMMENTS