Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महिलांनी कपडे नाही घातले तरी, सुंदर दिसतात

रामदेवबाबांचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यासमोरच आक्षेपार्ह वक्तव्य

मुंबई प्रतिनिधी - छत्रपती शिवाजी महाराजांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर महाराष्ट्रात संतापाची लाट असतांनाच, बाबा रामदेव यांनी ठाणे येथील एका

लेखक प्रदीप कुलकर्णी यांना प्रतिलिपी चा फेलोशिप अवॉर्ड प्राप्त
Nashik : मित्राला मिठी मारली म्हणून नाशिकमध्ये जीवघेणा हल्ला | LOKNews24
बायोसीड कंपनीचे शहंशाह मका वाण लावा आणि उत्पन्न वाढवा

मुंबई प्रतिनिधी – छत्रपती शिवाजी महाराजांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर महाराष्ट्रात संतापाची लाट असतांनाच, बाबा रामदेव यांनी ठाणे येथील एका कार्यक्रमात महिलांविषयी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. ठाणे शहरात शुक्रवारी योग शिबीर व महिला महासंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात बोलतांना रामदेव बाबा म्हणाले की, ’महिला या साडीमध्ये चांगल्या दिसतात, सलवार कमीजमध्येही चांगल्या दिसतात आणि माझ्या नजरेने पाहिले तर काही नाही घातले तरी चांगल्या दिसतात.’ विशेष म्हणजे या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव खासदार श्रीकांत शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या देखील यावेळी उपस्थित होत्या. त्यांच्या समोरच रामदेव बाबांनी महिलांच्या कपड्यांविषयी वक्तव्य केले.
संभाजी भिडे यांनी टिकली प्रकरण, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि सुधांशू त्रिवेदी यांचे छत्रपती शिवाजी महाराजांविषयी अवमानकारक वक्तव्यामुळे महाराष्ट्रात गदारोळ सुरू असतानाच आता योगगुरू बाबा रामदेव यांनी महिलांच्या कपड्यांविषयी धक्कादायक वक्तव्य केलं आहे. ठाणे शहरात नुकतेच योग शिबीर व महिला महासंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. योग शिबिरासाठी महिला सलवार-कमीज घालून आल्या होत्या व नंतर होणार्‍या महासंमेलनासाठी साड्या सोबत आणल्या होत्या. मात्र, वेळेच्या अभावी महिलांना कपडे बदलता आले नाही. हाच धागा पकडून बोलताना रामदेव बाबांनी वादाला आमंत्रण देणारे हे वक्तव्य केले. ‘एका मागोमाग एक कार्यक्रम असल्याने कपडे बदलायला वेळ मिळाला नाही, काही हरकत नाही, आता घरी जाऊन साड्या नेसा, असे उपस्थित महिलांना सांगतानाच रामदेव बाबा म्हणाले, ’महिला या साडीमध्ये चांगल्या दिसतात, सलवार कमीजमध्येही चांगल्या दिसतात आणि माझ्या नजरेने पाहिले तर काही नाही घातले तरी चांगल्या दिसतात. काही दिवसांपूर्वी संभाजी भिडे यांनी एका महिला पत्रकाराला टिकलीवरून सुनावले होते. टिकली लावून आलीस तरच तुझ्या प्रश्‍नाला उत्तर देईन, असे ते म्हणाले होते. त्यावरून मोठा वाद निर्माण झाला होता. राज्य महिला आयोगाने त्यांना नोटिसही बजावली आहे. या वक्तव्यावर खुलासा करण्यासाठी त्यांनी वेळही मागितली आहे. त्यातच आता रामदेव बाबा गोत्यात आले आहेत.

रामदेव बाबांना काळे फसणार – रुपाली ठोंबरे
बाबा रामदेव यांनी महिलांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर आता त्यांच्याविरोधात राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरे आक्रमक झाल्या आहेत. बाबा रामदेव यांना अक्कल नावाचा प्रकार नाही. रामदेव बाबा पुण्यात आल्यावर त्यांना काळे फसणार असा इशारा रुपाली ठोंबरे यांनी दिला आहे. महिलांनी काय घालायाच काय नाही हा तिच्या स्वातंत्र्याचा प्रश्‍न आहे. बाबा रामदेव यांचे हे वादग्रस्त वक्तव्य अमृता फडणवीस यांच्या समोर झाले आहे. अमृताताईंनी त्याचवेळी कानाखाली ओढली पाहिजे होती.

COMMENTS