Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आजोबांकडून नातीला यकृत दान

नागपूर : अवघ्या १० महिन्यांची चिमुकली. दुर्मीळ अशा आजाराचे निदान झाले. या आजारात आयुष्य केवळ दोन वर्षांचे असते. वैद्यकीय चाचण्यांमध्ये त्या बाळाल

उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई, सव्वा कोटीची विदेशी दारू कंटेनरमधून जप्त | LokNews24
विखे व श्री गणेश कारखान्याच्या कामगारांना तीन हप्त्यात थकीत देयके द्या : उच्च न्यायालय
आजचे राशीचक्र शुक्रवार,२९ऑक्टोबर २०२१ अवश्य पहा (Video)

नागपूर : अवघ्या १० महिन्यांची चिमुकली. दुर्मीळ अशा आजाराचे निदान झाले. या आजारात आयुष्य केवळ दोन वर्षांचे असते. वैद्यकीय चाचण्यांमध्ये त्या बाळाला यकृत प्रत्यारोपण हाच एकमेव पर्याय होता. अशावेळी कोणताही विचार न करता आजोबांनी आपल्या यकृताचा काही भाग देण्याची तयारी दाखवली अन् डॉक्टरांनी यकृत प्रत्यारोपण करून चिमुकलीला जीवदान दिले. शहरातील किम्स किंग्सवे हॉस्पिटलमध्ये दहा महिन्याच्या बाळावर यशस्वी प्रत्यारोपण झाले. एक जीवघेणा अनुवंशिक आजार घेऊन चिमुकली जन्माला आली. ज्यामुळे तिच्या यकृताला पित्त खंडित होण्यापासून रोखले गेले. काविळमुळे त्यांचा रंग फिकट झाला होता. प्रकृती हळूहळू खालावत होती. चिमुकलीला क्रिग्लर-नाजर सिंड्रोम हा जीवघेणा आजार होता. हा आजार अतिशय दुर्मिळ असून १ दशलक्ष मुलांपैकी एका मुलात आढळून येतो. विशेष असे की, हा आजार घेऊन जन्माला आलेल्या बाळाचे आयुष्य २ वर्ष असते असेही डॉक्टरांनी सांगितले. ‘आजोबा’कडून नातीला यकृत दानहोण्यापासून रोखले गेले. काविळमुळे त्यांचा रंग फिकट झाला होता. प्रकृती हळूहळू खालावत होती. चिमुकलीला क्रिग्लर-नाजर सिंड्रोम हा जीवघेणा आजार होता. हा आजार अतिशय दुर्मिळ असून १ दशलक्ष मुलांपैकी एका मुलात आढळून येतो. विशेष असे की, हा आजार घेऊन जन्माला आलेल्या बाळाचे आयुष्य २ वर्ष असते असेही डॉक्टरांनी सांगितले. १० तासांत यकृत प्रत्यारोपण आईचा रक्‍तगट जुळत नव्हता. वडील प्रत्यारोपणासाठी सक्षम नव्हते. अशा परिस्थितीत नेमकं काय करावं कुणालाच कळत नव्हतं. ही बाब आजोबांना कळली. आजोबा यकृताचा काही भाग दान करण्यासाठी पुढे आले. नागपूरच्या किम्स- किंग्सवे हॉस्पिटलमध्ये जिवंत दात्याचे यकृत प्रत्यारोपण केले. अवघ्या ६. ४ किलो वजनाच्या १० महिन्यांच्या बाळावर हा प्रयोग अत्यंत आव्हानात्मक होता. यकृत प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया १० तास चालली. शल्यचिकित्सक डॉ. प्रकाश जैन, डॉ. दीपक गोयल यांनी कुशल वैद्यकीय पथकाच्या मदतीने हे प्रत्यारोपण केले. बालरोगतज्ञ डॉ. कुलदीप सुखदेवे, डॉ. राजकुमार किरतकर यांनी बाळाची काळजी घेतली. डॉ राजन बारोकर, डॉ वीरेंद्र बेलेकर यांच्यासह हिपॅटोलॉजीचे व्यवस्थापन डॉ. समीर पाटील आणि डॉ. अमोल समर्थ यांनी केले. बधिरीकरण तज्ज्ञ डॉ. शीतल आव्हाड यांची मोलाची साथ या शस्त्रक्रियेला लाभली. प्रत्यारोपण समन्वयक शालिनी पाटील यांचेही महत्त्वाचे योगदान होते.

COMMENTS