Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

श्रद्धा वालकर हत्येप्रकरणी महाराष्ट्र पोलिसांची चौकशी

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिले आदेश

नवी दिल्ली : श्रद्धा वालकर(Shraddha Walker) हत्याकांड प्रकरणात महाराष्ट्र पोलिसांची चौकशी करणार, असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह(Amit S

मुंबईत गर्दीच्या ठिकाणी मास्कसक्ती होणार ?
मतदान ओळखपत्र नसेल तरी करता येणार मतदान  जिल्हाधिकारी यादव
दिल्ली महिला आयोगाचे 223 कर्मचारी बडतर्फ

नवी दिल्ली : श्रद्धा वालकर(Shraddha Walker) हत्याकांड प्रकरणात महाराष्ट्र पोलिसांची चौकशी करणार, असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह(Amit Shah) यांनी माध्यमांशी बोलताना केले. तसेच श्रद्धा प्रकरणात दोषींची गय केली जाणार नाही, असेही शाह यांनी म्हटले आहे.
शाह म्हणाले की, श्रद्धा वालकर हत्याकांडातील आरोपीला कमीत कमी वेळेत कठोरात कठोर शिक्षा दिली जाईल. माझे संपूर्ण प्रकरणावर लक्ष आहे. मी देशातील जनतेला एवढेच सांगू इच्छितो की, ज्या कोणीही हे कृत्य केले असेल, त्याला कमीत कमी वेळेत कायदा आणि न्यायालयाद्वारे कठोरात कठोर शिक्षा सुनावली जाईल. श्रद्धाने दोन वर्षांपूर्वीच महाराष्ट्र पोलिसांना चिठ्ठी लिहून आफताबची तक्रार केल्याचे काही दिवसांपूर्वी तपासातून समोर आले होते. याच पार्श्‍वभूमीवर महाराष्ट्र पोलिसांनी या प्रकरणाचा पाठपुरावा का केला नाही? यासारखे अनेक प्रश्‍न उपस्थित करण्यात येत होते. याच पार्श्‍वभूमीवर महाराष्ट्र पोलिसांच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. श्रद्धा वालकर प्रकरणाचा तपास दिल्ली आणि मुंबई पोलिसांकडून सुरू आहे. दिल्ली आणि मुंबई पोलिसांमध्ये समन्वयाचा अभाव नाही. जे पत्र समोर आले आहे. त्यात दिल्ली पोलिसांची कोणतीही भूमिका नव्हती. श्रद्धाने महाराष्ट्रातील एका पोलिस ठाण्यात पत्र पाठवून तिच्या शरीराचे तुकडे-तुकडे करून तिला जीवे मारण्याची धमकी आफताबकडून दिली जात असल्याचे सांगितले होते. पण त्यावेळी कोणतीही कारवाई झालेली नाही. याच गोष्टीची चौकशी केली जाईल. त्यावेळी आमचे सरकार नव्हते. त्यामुळे त्यावेळी जे कोणी जबाबदार असतील, त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, असेही शाह यांनी सांगितले.

COMMENTS