Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कृषीमंत्री सत्तारांचा पाय आणखी खोलात

व्यावसायिकांना लाच मागणारा दीपक गवळी सत्तारांचा ’स्वीय सहायक’

अकोला/प्रतिनिधी ः राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार आपल्या अनेक वादग्रस्त कारनाम्यामुळे त्यांचे नाव चर्चेत असतांना, आता पुन्हा एकदा ते वेगळ्याच क

TET परीक्षा घोटाळ्यात सत्तारांच्या दोन्ही मुलींचे नाव आहेत की नाही ?
कृषीमंत्री सत्तारांचा पाय आणखी खोलात
शंखी गोगलगायीमुळे नुकसानीची भरपाई देणार, समिती स्थापणार : मंत्री अब्दुल सत्तार

अकोला/प्रतिनिधी ः राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार आपल्या अनेक वादग्रस्त कारनाम्यामुळे त्यांचे नाव चर्चेत असतांना, आता पुन्हा एकदा ते वेगळ्याच कारणांनी चर्चेत आले आहे. कृषी विभागाने विदर्भातील अकोल्यामध्ये टाकलेल्या तथाकथित धाडीमध्ये समावेश असलेला आणि व्यावसायिकांना लाच मागणारा दीपक गवळी हा कृषी अब्दुल सत्तारांचा ’स्वीय सहायक’ असल्याचे पत्र समोर आल्यामुळे सत्तारांचा पाय आणखी खोलात गेला आहे.
कृषीमंत्री सत्तारांनी गवळी आपला ’स्वीय सहायक’ नसल्याचे म्हटले असले तरी शासकीय पत्राने कृषिमंत्र्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. मात्र, अब्दुल सत्तार यांनी हा दावा फेटाळला आहे. दीपक गवळी हा आपला ’स्वीय सहायक’  नाही, तर कृषी अधिकारी असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या नावे अकोल्यामध्ये कृषी विभागाच्या कथित पदकाने धाडी टाकल्या होत्या. या पथकात अधिकारी नसलेल्या अनेक खासगी व्यक्तींचाही समावेश असल्याची माहिती समोर आली होती. यात अब्दुल सत्तार यांचा स्वीय सहाय्यक दीपक गवळी याचा देखील समावेश असल्याचे उघड झाले आहे. अशातच या पथकाने पैशाची मागणी केल्याचा गंभीर आरोप एका खत कंपनीच्या व्यवस्थापकाकडून करण्यात आला आहे. या प्रकरणावरून ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख आणि राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी अब्दुल सत्तार यांच्यावर निशाणा साधला आहे. दीपक गवळी हे ’स्वीय सहायक’ असल्याचा दावा सोमवारी कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी फेटाळला. ते माध्यमांशी बोलताना म्हणाले की, दीपक गवळी हा कृषी अधिकारी आहे. माझ्या काही शासकीय दौर्‍यात त्यांचा ’स्वीय सहायक’ असा उल्लेख झाला आहे. मात्र, ते माझे ’स्वीय सहायक’ नाहीत. कृषी विभागातल्या 62 अधिकार्‍यांनी मे महिन्यापासून 86 कारवाया केल्या आहेत. आतापर्यंत त्यांनी 269 कारवाया केल्या आहेत. त्यात हे दीपक गवळीही होते. कृषी विभागाच्या विरोधात तक्रार करणार्‍या कंपनी विरोधात कृषी विभागाने कारवाई सुरू केली आहे. मात्र, या धाडीत काही चुकीचे झाले नसल्याचे अब्दुल सत्तार यांनी म्हटले आहे. या मतदारसंघातील माझ्या सहकार्‍यांनी मला सांगूनच तेथे हजेरी लावली असल्याची माहिती देखील त्यांनी दिली. अकोल्यातून अनेक तक्रारी प्राप्त झाल्यामुळे ही कारवाई केली असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, आता दीपक गवळी नावावरून हे प्रकरण चांगलेच तापण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कृषी विभागाच्या वतीने अकोल्यातील काही कंपन्यांवर धाडी टाकण्यात आल्या होत्या. या धाडीमध्ये असलेल्या पथकाने पैशाची मागणी केली असल्याची तक्रार कंपन्यांकडून करण्यात आली. तसेच या धाडीमध्ये कृषी विभागाच्या अधिकारार्‍या व्यतिरिक्त अनेक खाजगी व्यक्ती असल्याचे समोर आले होते. त्यामुळे अब्दुल सत्तार यांच्यावर आरोप करण्यात आले होते. आता या प्रकरणात अब्दुल सत्तार चांगलेच अडचणीत येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

COMMENTS