Homeताज्या बातम्या

बैठका घेतल्या तरी जाणारे थांबणार नाही उद्योगमंत्री सांमत यांचा मातोश्रीवरील बैठकीवरून ठाकरेंना टोला

मुंबई : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील खासदारांच्या पक्षांतराच्या पार्श्‍वभूमीवर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. या पार्श्‍वभू

डॉ. प्रीतम भी. गेडाम यांना महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार; राष्ट्रपिता महात्मा गांधी राज्यस्तरीय व्यसनमुक्ती सेवा पुरस्काराने गौरव
कर्जमाफीसह विद्यार्थ्यांच्या प्रलंबित प्रश्नांवर सकारात्मक निर्णय घ्याआ. रोहित पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा
आ. शिवतारेंना मुलीने किडनी दान देत दिले नवजीवन
राज्यात दोन वर्षात पाच लाख कोटींची गुंतवणूक, उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली माहिती Ratnagiri Marathi News | Investment of five lakh crores in the state in two years, Industries ...


मुंबई : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील खासदारांच्या पक्षांतराच्या पार्श्‍वभूमीवर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. या पार्श्‍वभूमीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संबंधित मतदारसंघांचा दौरा करून आमदारांची तातडीची बैठक बोलावली आहे. मात्र, या बैठकीवर राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी टीका करत, बैठका घेऊन पक्षांतर रोखता येणार नसल्याचा दावा केला.
माध्यमांशी संवाद साधताना सामंत म्हणाले, यापूर्वीही खासदारांची बैठक घेण्यात आली होती. मात्र, त्यानंतरही अनेक खासदारांनी पक्ष सोडला. त्यामुळे आता कितीही बैठका घेतल्या तरी जाण्याचा निर्णय घेतलेले लोक थांबतील, असे वाटत नाही. यावेळी त्यांनी शिवसेनेत होत असलेल्या नव्या पक्षप्रवेशांचाही उल्लेख केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्‍वास व्यक्त करत अनेक नेते आणि लोकप्रतिनिधी शिवसेनेत प्रवेश करत असल्याचा दावा त्यांनी केला. मागील काही दिवसांत सचिन अहिर, गोकुळ गिते, किरण सरनाईक यांच्यासह विधानसभेतील तीन आमदारांनीही शिवसेनेत प्रवेश केल्याचे त्यांनी सांगितले. सामंत यांच्या मते, या नव्या पक्षप्रवेशांमुळे विधान परिषदेतील शिवसेनेचे संख्याबळ वाढले असून पक्षाची संघटनात्मक ताकद अधिक मजबूत झाली आहे. आगामी काळात आणखी काही नेते शिवसेनेत प्रवेश करतील, असे संकेतही त्यांनी दिले. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी काँग्रेसच्या एका आमदाराला पक्षांतरासाठी मोठ्या रकमेचे प्रलोभन देण्यात आल्याचा आरोप केला होता. या आरोपांवर प्रतिक्रिया देताना उदय सामंत यांनी तो आरोप फेटाळून लावला. ते म्हणाले, यापूर्वीही अशा प्रकारचे अनेक आरोप करण्यात आले होते. आता आरोपांमधील रकमेचाही आकडा बदलत आहे. अशा आधारहीन आणि पुराव्याशिवाय केलेल्या आरोपांवर महाराष्ट्रातील जनता विश्‍वास ठेवणार नाही.

COMMENTS