Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

ड्रोनच्या साहाय्याने प्रभागाचा नकाशा तयार जनगणना कार्यात डॉ.अमोल बागुल यांचा अभिनव उपक्रम

अहिल्यानगर: गृह मंत्रालय,भारत सरकारच्यावतीने डिजिटल जनगणना उपक्रमाच्या पार्श्वभूमीवर अहिल्यानगर महानगरपालिका क्षेत्रात जनगणना पूर्वतयारीचे काम वे

शिक्षकांच्या बदल्यांना यंदा ‘ब्रेक’! जनगणनेच्या कामामुळे राज्य सरकारचा मोठा निर्णय
बनावट जनगणना अर्जात माहिती भरू नका; राज्य सरकारचे नागरिकांना आवाहन
पदोन्नती रखडली, समायोजनाची घाई; नांदेडमध्ये शिक्षक संघटनांचा संताप उफाळला

अहिल्यानगर: गृह मंत्रालय,भारत सरकारच्यावतीने डिजिटल जनगणना उपक्रमाच्या पार्श्वभूमीवर अहिल्यानगर महानगरपालिका क्षेत्रात जनगणना पूर्वतयारीचे काम वेगाने सुरू असून, प्रगणक शिक्षक डॉ. अमोल बागुल यांनी आपल्या कार्यक्षेत्रात एक अभिनव आणि तंत्रज्ञानाधिष्ठित उपक्रम राबविला आहे.
स्वतःकडे जनगणनेसाठी आलेल्या घरयादी प्रभागाचा अचूक व अद्ययावत नकाशा तयार करण्यासाठी त्यांनी आधुनिक ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. ड्रोनच्या सहाय्याने संपूर्ण परिसराचे हवाई छायाचित्रण करून त्या आधारे प्रभागातील रस्ते, घरे, गल्ली, प्रमुख ठिकाणे व भौगोलिक रचना यांचे बारकाईने निरीक्षण करण्यात आले. या माहितीच्या आधारे जनगणना कार्यासाठी उपयुक्त असा सुस्पष्ट व अद्ययावत नकाशा तयार करण्यात आला.
याप्रसंगी आयुक्त तथा मुख्य जनगणना अधिकारी यशवंत डांगे यांनी नमूद केले की”या उपक्रमामुळे घरांची अचूक ओळख, क्षेत्रनिहाय नियोजन, घरभेटींची सुलभता आणि जनगणना प्रक्रियेतील अचूकता वाढण्यास मोठी मदत होणार आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून जनगणना कार्य अधिक प्रभावी करण्याचा हा प्रयत्न इतर प्रगणकांसाठीही प्रेरणादायी ठरत आहे.”
यावेळी,सहाय्यक आयुक्त मेहेर लहारे, प्रभाग अधिकारी बाळासाहेब पवार, मास्टर ट्रेनर डॉ.संतोष देशमुख, रफिक देशमुख, पर्यवेक्षक अलका दहातोंडे व प्रगणक आदी उपस्थित होते.
याविषयी बोलताना डॉ. बागुल यांनी सांगितले की, “जनगणना ही अत्यंत महत्त्वाची राष्ट्रीय प्रक्रिया आहे. तंत्रज्ञानाचा योग्य वापर केल्यास हे कार्य अधिक अचूक, सुलभ आणि परिणामकारक होऊ शकते. त्याच उद्देशाने ड्रोनच्या सहाय्याने नकाशा तयार करण्याचा हा प्रयत्न केला.”  अहिल्यानगर महानगरपालिका क्षेत्रातील या नाविन्यपूर्ण उपक्रमाची नागरिकांसह शैक्षणिक आणि प्रशासकीय क्षेत्रातही चर्चा होत असून, डिजिटल भारताच्या दिशेने हे एक प्रभावी पाऊल मानले जात आहे.

COMMENTS