Homeताज्या बातम्या

किनवट-माहूरच्या शेतकर्‍यांना न्याय द्या; प्रलंबित पीक विमा तातडीने वितरित करामुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व कृषी मंत्री दत्ता भरणे यांच्याकडे आ.केराम यांची जोरदार मागणी

 किनवट-माहूर विधानसभा मतदारसंघातील इस्लापूर, जलधरा, मांडवी, सिंदगी, वानोळा, माहूर, सिंदखेड व वाई बाजार महसूल मंडळांतील हजारो पात्र शेतकरी अद्यापह

धुळे जिल्ह्यात कापूस पीकविमा रखडला; सरसकट कर्जमाफीच्या मागणीसाठी शिरपूर फर्स्टचे अनोखे आंदोलन
वादळाने केळी भुईसपाट; निवघ्यात खा.चव्हाणांची पाहणीहेक्टरी दोन लक्ष रूपयांची मागणी
शेतकर्‍यांच्या प्रश्नांवर सभागृहात आवाज उठवा, अन्यथा राजीनामा द्या!- लिंबागणेश येथे बॅनरबाजीसरसकट कर्जमुक्ती, 2025 चा पिकविमा, शेतकरी अनुदान व अन्य प्रलंबित मागण्यांवर लोकप्रतिनिधींनी ठोस भूमिका घ्यावी; डॉ. गणेश ढवळे यांची मागणी



 किनवट-माहूर विधानसभा मतदारसंघातील इस्लापूर, जलधरा, मांडवी, सिंदगी, वानोळा, माहूर, सिंदखेड व वाई बाजार महसूल मंडळांतील हजारो पात्र शेतकरी अद्यापही पीक विम्याच्या लाभापासून वंचित असल्याने त्यांना प्रलंबित पीक विम्याची रक्कम तातडीने वितरित करण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून द्यावा, अशी जोरदार मागणी आमदार भीमराव केराम यांनी मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस आणि कृषी मंत्री दत्ता भरणे यांच्याकडे स्वतंत्र पत्रांद्वारे केली आहे.
आ. केराम यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, नांदेड जिल्ह्यातील इतर भागांमध्ये पीक विम्याचे वितरण सुरू असताना किनवट-माहूर मतदारसंघातील हजारो पात्र शेतकरी अजूनही प्रतीक्षेत आहेत. पीक विम्याची रक्कम मंजूर होऊनही लाभार्थ्यांच्या खात्यात ती जमा न झाल्याने शेतकर्‍यांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. नापिकी, कर्जबाजारीपणा, वाढलेला शेतीखर्च, अपुरा वीजपुरवठा, पीककर्जातील अडचणी आणि आर्थिक संकटामुळे शेतकरी मोठ्या अडचणीत सापडले आहेत. अशा वेळी पीक विम्याची रक्कम हा त्यांच्यासाठी मोठा आर्थिक आधार असून वितरणातील विलंबामुळे शासनाच्या योजनांवरील विश्वास कमी होत असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित विमा कंपनी, कृषी विभाग आणि जिल्हा प्रशासनाला तात्काळ निर्देश देऊन आवश्यक निधी उपलब्ध करावा, सर्व पात्र शेतकर्‍यांच्या खात्यात युद्धपातळीवर पीक विम्याची रक्कम जमा करावी आणि वितरणासाठी निश्चित कालमर्यादा निश्चित करून त्याचा अहवाल शासनाकडे सादर करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणीही आ. केराम यांनी केली आहे. शेतकर्‍यांच्या हक्काचा एकही रुपया अडवून ठेवला जाणार नाही. प्रत्येक पात्र शेतकर्‍याला पीक विम्याची रक्कम मिळेपर्यंत मी सातत्याने शासनाकडे पाठपुरावा करणार असून, शेतकर्‍यांच्या न्यायासाठी माझा लढा कायम राहील, असा ठाम निर्धार आमदार भीमराव केराम यांनी व्यक्त केला आहे.

COMMENTS