Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

श्रीगोंद्याची श्रुतिका झगडे वेशभूषा स्पर्धेत जिल्ह्यात अव्वल

श्रीगोंदा प्रतिनिधी : जिल्हा परिषद अहमदनगर प्राथमिक शिक्षण विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय वेशभूषा स्पर्धेमध्ये जिल्हा परिषद

जर्मनी येथील ४० साईभक्तांनी श्री साईबाबांच्‍या समाधीचे घेतले दर्शन
कोरेगावचा लुटारू अखेर कर्जत पोलिसांकडून जेरबंद
कर्जत- जामखेडच्या ११५१ शिक्षकांना प्रशिक्षण

श्रीगोंदा प्रतिनिधी : जिल्हा परिषद अहमदनगर प्राथमिक शिक्षण विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय वेशभूषा स्पर्धेमध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आढळगाव येथील विद्यार्थिनी श्रुतिका सचिन झगडे हिने प्रथम पारितोषिक मिळवले.
स्पर्धेमध्ये तिने ‘स्वराज्य सौदामिनी महाराणी ताराराणी‘ यांची वेशभूषा सादर केली. तसेच परीक्षकांनीही तिच्या अभिनयाची, वेशभूषेची प्रशंसा केली. या वेशभूषेने उपस्थितांच्या नजरेचे पारणे फेडले. आढळगाव येथील प्राथमिक शिक्षिका शारदा गायकवाड-झगडे व महादजी शिंदे विद्यालयातील सचिन झगडे यांची ती कन्या आहे. इतरही अनेक स्पर्धा तिने प्राविण्य मिळवले आहे. यासाठी तिला वर्गशिक्षिका सुहासिनी साळुंखे, शिक्षक जालिंदर काळे, गौतमी सोनमाळी, मुख्याध्यापिका स्वाती लांगोरे, सर्व शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल केंद्रप्रमुख अनिल भदागरे, गटशिक्षणाधिकारी अनिल शिंदे, जिल्हा शिक्षणाधिकारी भास्कर पाटील, स्थानिक स्कूल कमिटीचे सर्व पदाधिकारी तसेच आढळगावचे सरपंच, उपसरपंच सर्व सदस्य सर्व ग्रामस्थांकडून श्रुतिकाचे कौतुक होत आहे.

COMMENTS