Homeताज्या बातम्या

नांदेडमध्ये आरटीओ कार्यालयासमोरील अतिक्रमणांवर अखेर हातोडा; सिडको औद्योगिक वसाहतीची पोलिस बंदोबस्तात धडक कारवाई

नांदेड : सिडको औद्योगिक वसाहतीतील वाढत्या अतिक्रमणांविरोधात कारखानदार आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी केलेल्या तक्रारींची दखल घेत प्रशासनाने अखेर

गुटखा-पानमसाला, खाद्यतेल अन् बेकरी उत्पादनांवर अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई; नांदेड जिल्ह्यातील अनेक पेढ्या सील
’पत्रकारीते’च्या आडून जुगाराचा डाव!माजी शिक्षणाधिकार्‍यांसह बड्या धेंडांवर पोलिसांची धाड; 9 जुगारमल्ले गजाआड
नांदेड पोलिसांचे ‘ऑपरेशन फ्लश आऊट’; भाग्यनगरमधील खून आणि उस्माननगरमधील दरोड्याच्या गुन्ह्यातील मुख्य फरार आरोपी जेरबंद

नांदेड : सिडको औद्योगिक वसाहतीतील वाढत्या अतिक्रमणांविरोधात कारखानदार आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी केलेल्या तक्रारींची दखल घेत प्रशासनाने अखेर धडक कारवाई सुरू केली आहे. या विशेष मोहिमेअंतर्गत गुरुवारी (दि. १२ जून २०२६) आरटीओ कार्यालयासमोरील सर्व बेकायदेशीर अतिक्रमणे जेसीबीच्या साहाय्याने हटविण्यात आली. काही घटकांच्या तीव्र विरोधानंतर पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवत ही कारवाई यशस्वीपणे पूर्ण केली.

गेल्या अनेक महिन्यांपासून सिडको औद्योगिक वसाहतीतील रस्ते, मोकळ्या जागा आणि शासकीय भूखंडांवर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणे वाढली होती. यामुळे वाहतुकीची कोंडी होऊन स्थानिक उद्योगांना मोठा अडथळा निर्माण होत होता. विशेषतः आरटीओ कार्यालय परिसरात बस्तान मांडून बसलेल्या एजंट आणि दलालांमुळे कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत होता. ही कारवाई सुरू होताच येथील दलालांची मोठी तारांबळ उडाली. कारवाईदरम्यान एका दिव्यांग व्यक्तीने थेट जेसीबीच्या टोपल्यात बसून विरोध करण्याचा प्रयत्न केला, मात्र सिडको ग्रामीण पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणत कारवाई पुढे सुरू ठेवली.

सिडको औद्योगिक वसाहतीचे प्रादेशिक अधिकारी राजाराम गुठले यांनी सांगितले की, वसाहतीतील सर्व प्रकारची अतिक्रमणे हटविण्यासाठी तीन दिवसांची व्यापक मोहीम हाती घेण्यात आली आहे. अतिक्रमणमुक्त झालेल्या जागांवर भविष्यात वृक्षारोपण केले जाईल. या धडक मोहिमेत उपरचनाकार चव्हाण, कार्यकारी अभियंता जावेद, क्षेत्रीय व्यवस्थापक गजानन कपाळे, सुरेखा फड, श्रीकांत तमखाने आणि संदीप देशमुख आदी अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष सहभाग घेतला.

COMMENTS