Homeताज्या बातम्या

पिंपरनईचा गावतलाव पूर्णपणे कोरडा; प्रशासकीय दुर्लक्षामुळे ग्रामस्थांवर खड्डे खोदून पाणी वापरण्याची वेळ

बीड : बीड तालुक्यातील पिंपरनई येथील गाव साठवण तलाव पूर्णपणे कोरडा पडला आहे. शेतीसाठी आणि इतर कारणांसाठी झालेल्या अनिबंध पाणीउपशामुळेच ही गंभीर पर

नांदेड जिल्हास्तरीय ‘अस्मिता लीग’ सायकल स्पर्धा उत्साहात; ८० महिला खेळाडूंचा उत्स्फूर्त सहभाग
भ्रष्टाचारी कर्मचाऱ्यांना पाठीशी घालू नका, बीड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना बदामराव पंडितांची तंबी
तुकाराम मुंडेंचा धडाका! एफडीएच्या धाडसत्राने नांदेडमधील भेसळखोरांचे धाबे दणाणले; निकृष्ट मालाची गुपचूप विल्हेवाट सुरू

बीड : बीड तालुक्यातील पिंपरनई येथील गाव साठवण तलाव पूर्णपणे कोरडा पडला आहे. शेतीसाठी आणि इतर कारणांसाठी झालेल्या अनिबंध पाणीउपशामुळेच ही गंभीर परिस्थिती निर्माण झाल्याचा थेट आरोप ग्रामस्थांनी केला आहे. तलावात आता केवळ गाळ शिल्लक राहिल्याने ग्रामस्थांना तलावाच्या पात्रात खड्डे (झिरे) खोदून झिरपणारे दूषित पाणी दैनंदिन वापरासाठी वापरण्याची दुर्दैवी वेळ आली आहे.

स्थानिक नागरिक सुनील भोसले यांनी दिलेल्या माहितीनुसार, फेब्रुवारी महिन्यातच आगामी उन्हाळा आणि संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन तलावातील अनधिकृत पाणीउपसा तातडीने थांबवावा, अशी लेखी मागणी प्रशासनाकडे करण्यात आली होती. त्यानंतर तलाठी गणपत पोतदार यांनी दोनदा घटनास्थळी भेट देऊन पाणीउपसा थांबवण्याच्या सूचनाही दिल्या होत्या. मात्र, प्रशासकीय आदेशांना केराची टोपली दाखवत उपसा सुरूच राहिल्याने तलाव वेळेआधीच रिकामा झाला. तलावातील उरलेले पाणी आता अत्यंत हिरवट व दूषित झाले असून ते आरोग्यासाठी घातक ठरत आहे.

या संदर्भात सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे यांनी मार्च महिन्यातच जिल्हाधिकार्‍यांकडे अवैध पाणीउपशाबाबत रीतसर तक्रार केली होती. जिल्हाधिकार्‍यांनी पिण्याच्या पाण्याचे नियोजन बिघडू नये म्हणून तातडीने कारवाईचे आदेश दिले होते; मात्र स्थानिक यंत्रणेकडून त्याची प्रभावी अंमलबजावणी झालीच नाही.

बीड जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती गंभीर बीड जिल्ह्यातील एकूण १४३ प्रकल्पांपैकी ७३ प्रकल्प सध्या पूर्णतः कोरडे पडले आहेत, तर ५४ प्रकल्पांत २५ टक्क्यांपेक्षा कमी जलसाठा शिल्लक आहे. जिल्ह्यातील मुख्य बिंदुसरा धरणात २३ टक्के तर सिंदफणा धरणात अवघा १६.५ टक्के जिवंत जलसाठा शिल्लक असल्याने पाणीटंचाईने उग्र रूप धारण केले आहे. पुरेसा पाऊस झाल्याशिवाय शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, असे आवाहन आता प्रशासनाकडून केले जात आहे.

COMMENTS