Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

यश नगरीत विजेच्या खांब्याला अचानक आग; वाहनांचे नुकसान, नागरिकांत घबराट

नांदेड : नांदेड शहरातील वाडी बु. परिसरात असलेल्या यश नगरी भागात शनिवारी दुपारी अचानक विजेच्या खांब्याला आग लागल्याने परिसरात काही काळ भीतीचे वाता

मध्य प्रदेशातील नौका दुर्घटनेतील मृतांचा आकडा 13 वर
कोट्यवधींची ‘केमिकल’ डागडुजी फेल; जिल्हा परिषद इमारत मृत्यूच्या उंबरठ्यावर!भेगांनी पोखरलेल्या इमारतीत कर्मचारी कामावर; प्रशासनाच्या निष्काळजीपणावर संताप
मान्सूनपूर्व तयारीसाठी महापालिकेची मॉक ड्रिल; पूरस्थितीत बचाव कार्याचे प्रात्यक्षिक

नांदेड : नांदेड शहरातील वाडी बु. परिसरात असलेल्या यश नगरी भागात शनिवारी दुपारी अचानक विजेच्या खांब्याला आग लागल्याने परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. विजेच्या खांब्याजवळ उभ्या असलेल्या दुचाकी व चारचाकी वाहनांच्या काही भागांचे आगीत नुकसान झाल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली.
दुपारच्या सुमारास अचानक विजेच्या खांब्यातून ठिणग्या उडू लागल्या आणि काही क्षणांतच आगीने तीव्र रूप धारण केले. आगीचे लोळ खांब्यालगतच्या इमारतीच्या दिशेने पसरू लागल्याने नागरिकांनी तातडीने घराबाहेर धाव घेतली. परिसरातील नागरिकांनी प्रसंगावधान राखत वाहनं दूर हलविण्याचा प्रयत्न केला. काहींनी पाणी व उपलब्ध साधनांच्या मदतीने आग नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न केले. घटनेची माहिती संबंधित विभागाला देण्यात आल्याचा दावा नागरिकांनी केला. मात्र आग लागल्यानंतर बराच वेळ उलटूनही महावितरणचा एकही कर्मचारी घटनास्थळी पाहणीसाठी किंवा मदतीसाठी पोहोचला नसल्याची नाराजी स्थानिकांनी व्यक्त केली. सध्या जिल्ह्यात वाढत्या तापमानामुळे वीज यंत्रणांवर ताण वाढत असल्याचे बोलले जात आहे. उष्णतेच्या पार्श्वभूमीवर वीज खांब, ट्रान्सफॉर्मर व तारांची नियमित तपासणी करून प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, तसेच अशा घटनांकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

COMMENTS