Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जवळा गटातील शेतकऱ्यांचा वीजप्रश्न मार्गी लागणार; आजिनाथ हजारेंची सभापती प्रा.राम शिंदे यांच्याकडे मागणी

जामखेड : तालुक्यातील जवळा जिल्हा परिषद गटातील शेतकऱ्यांचा विजेचा महत्वाचा प्रश्न सोडविण्यासाठी जवळा येथे सबस्टेशनसाठी 5 एमव्हीए पॉवर ट्रान्सफार्मर बसविणे अवश्यक आहे. ही शेतकऱ्यांची महत्वाची बाब लक्षात घेऊन ज्योती क्रांती मल्टीटेटचे चेअरमन अजिनाथ हजारे यांनी विधानपरिषद सभापती प्रा.राम शिंदे यांच्याकडे शेतकऱ्यांसाठी साकडे घातले आहे. याबाबत सभापती आ. राम शिंदे यांनीही वीज वितरण आधिकारयांशी फोन द्वारे संपर्क साधून सदर प्रश्न तातडीने मार्गी लावण्याच्या सूचना केल्या आहेत. जामखेड तालुक्यातील जवळा जिल्हा परिषद गटातील जवळा येथे 33/11 के व्ही वीज उपकेंद्र आहे. सध्या वाढती लोकसंख्या व वाढते बागायती क्षेत्र यामुळे शेतीपंपाची संख्या नवीन वीज जोडणे तसेच गावठाण व ग्रामीण भागातील वाढलेली वीज मागणी यामुळे हे उपकेंद्र सध्या पूर्ण क्षमतेपेक्षा अधिक भाराखाली आहे परिणामी शेतकऱ्यांना शेतीपंपासाठी पुरेसा दाबाची वीज मिळत नसून अनेक वेळा रात्री सिंचन करावी लागत आहे. कमी होल्टेजमुळे अनेक शेतकऱ्यांच्या वीज पंप व बोरवेलच्या मोटरी जळने, फ्युज उडणे वारंवार वीज खंडित होणे असे प्रकार वाढले असून याचा फटका सर्वांनाच बसत आहे. या वीज उपकेंद्रांतर्गत सात फिटर आहेत त्यामुळे संपूर्ण परिसरात भार हा एकाच उपकेंद्रावर असल्याने ट्रान्स्फॉर्मर अपुरे पडत आहेत . या सबस्टेशन साठी 5 एमव्हीए पावर ट्रान्सफरची आवश्यकता असून या ठिकाणी तातडीने हे मंजूर करून द्यावी अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे नेते तथा भाजपा कोषाध्यक्ष अजिनाथ हजारे यांनी चोंडी येथे सभापती राम शिंदे यांच्या निवासस्थानी जाऊन शेतकऱ्यासह निवेदन दिले आहे. यावेळी चेअरमन अजिनाथ हजारे, जामखेड बाजार समितीचे सभापती पै शरद कारले, मारूती रोडे, राजेंद्र हजारे, गौतम कोल्हे, किसन सरोदे, भाजपा युवा नेते बाजीराव गोपाळघरे,सतिश हजारे, युवा नेते संकेत हजारे यांच्यासह शेतकरी मोठया संख्येने उपस्थित होते. सभापती प्रा. राम शिंदे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने सूचना केल्या असल्याने सदर शेतकऱ्यांचा प्रश्न लवकरच मार्गा लागणार आहे.

जीवघेण्या हल्ल्यांतील आरोपी २४ तासांत जेरबंद; परस्परविरोधी गुन्ह्यांत शेवगाव पोलिसांची धडक कारवाई; मुख्य आरोपींना अटक
संगमनेरमध्ये तरुणीवर चाकूने वार; हल्लेखोराने शेततळ्यात घेतली उडी
जामखेडमध्ये गोळीबारात जखमी झालेल्या पैलवान सागर मोहोळकरचा उपचारादरम्यान मृत्यू

जामखेड : तालुक्यातील जवळा जिल्हा परिषद गटातील शेतकऱ्यांचा विजेचा महत्वाचा प्रश्न सोडविण्यासाठी जवळा येथे सबस्टेशनसाठी 5 एमव्हीए पॉवर ट्रान्सफार्मर बसविणे अवश्यक आहे. ही शेतकऱ्यांची महत्वाची बाब लक्षात घेऊन ज्योती क्रांती मल्टीटेटचे चेअरमन अजिनाथ हजारे यांनी विधानपरिषद सभापती प्रा.राम शिंदे यांच्याकडे शेतकऱ्यांसाठी साकडे घातले आहे. याबाबत सभापती आ. राम शिंदे यांनीही वीज वितरण आधिकारयांशी फोन द्वारे संपर्क साधून सदर प्रश्न तातडीने मार्गी लावण्याच्या सूचना केल्या आहेत.

जामखेड तालुक्यातील जवळा जिल्हा परिषद गटातील जवळा येथे 33/11 के व्ही वीज उपकेंद्र आहे. सध्या वाढती लोकसंख्या व वाढते बागायती क्षेत्र यामुळे शेतीपंपाची संख्या नवीन वीज जोडणे तसेच गावठाण व ग्रामीण भागातील वाढलेली वीज मागणी यामुळे हे उपकेंद्र सध्या पूर्ण क्षमतेपेक्षा अधिक भाराखाली आहे परिणामी शेतकऱ्यांना शेतीपंपासाठी पुरेसा दाबाची वीज मिळत नसून अनेक वेळा रात्री सिंचन करावी लागत आहे. कमी होल्टेजमुळे अनेक शेतकऱ्यांच्या वीज पंप व बोरवेलच्या मोटरी जळने, फ्युज उडणे वारंवार वीज खंडित होणे असे प्रकार वाढले असून याचा फटका सर्वांनाच बसत आहे. या वीज उपकेंद्रांतर्गत सात फिटर आहेत त्यामुळे संपूर्ण परिसरात भार हा एकाच उपकेंद्रावर असल्याने ट्रान्स्फॉर्मर अपुरे पडत आहेत . या सबस्टेशन साठी 5 एमव्हीए पावर ट्रान्सफरची आवश्यकता असून या ठिकाणी तातडीने हे मंजूर करून द्यावी अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे नेते तथा भाजपा कोषाध्यक्ष अजिनाथ हजारे यांनी चोंडी येथे सभापती राम शिंदे यांच्या निवासस्थानी जाऊन शेतकऱ्यासह निवेदन दिले आहे.

यावेळी चेअरमन अजिनाथ हजारे, जामखेड बाजार समितीचे सभापती पै शरद कारले, मारूती रोडे, राजेंद्र हजारे, गौतम कोल्हे, किसन सरोदे, भाजपा युवा नेते बाजीराव गोपाळघरे,सतिश हजारे, युवा नेते संकेत हजारे यांच्यासह शेतकरी मोठया संख्येने उपस्थित होते. सभापती प्रा. राम शिंदे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने सूचना केल्या असल्याने सदर शेतकऱ्यांचा प्रश्न लवकरच मार्गा लागणार आहे.

COMMENTS