Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राष्ट्रवादी पक्षावर ताबा मिळवण्यासाठी ‘कट-कारस्थान; ’आमदार रोहित पवारांचा पटेल आणि तटकरेंवर गंभीर आरोप

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातील आमदार रोहित पवार यांनी विधिमंडळ परिसरात पत्रकार परिषद घेत प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्याव

पाकचा काबूलवर हवाई हल्ला; 400 जणांचा मृत्यू
कर्जतमध्ये गॅसचा सुरळीत पुरवठा
इराकमध्ये अमेरिकेच्या दूतावासावर ड्रोन हल्ला

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातील आमदार रोहित पवार यांनी विधिमंडळ परिसरात पत्रकार परिषद घेत प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यावर गंभीर आरोप केले. पक्षावर ताबा मिळवण्यासाठी सुनियोजित कट रचण्यात आल्याचा दावा त्यांनी करत, काही निर्णय आणि घडामोडींवर संशय व्यक्त केला.
रोहित पवार यांनी सांगितले की, पक्षाच्या अंतर्गत रचनेत बदल करण्याचा प्रयत्न करण्यात आला. कार्याध्यक्षांना पूर्ण अधिकार देण्याबाबत काही कागदपत्रे तयार करण्यात आली असून, त्यावर काही नेत्यांच्या सह्या असल्याचा आरोप त्यांनी केला. संबंधित कागदपत्रे इतर पदाधिकार्‍यांना न सांगता निवडणूक आयोगाकडे सादर केल्याचेही त्यांनी नमूद केले. पुढे बोलताना त्यांनी असा आरोप केला की, काही नेत्यांनी पक्षातील निर्णय प्रक्रियेवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. अजित पवार यांच्या अनुपस्थितीत किंवा दुर्लक्षात ठेवून हे निर्णय घेतले गेल्याचा दावा त्यांनी केला. या सर्व प्रक्रियेबाबत पारदर्शकता नसल्यामुळे संशय निर्माण होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. रोहित पवार यांनी अत्यंत गंभीर स्वरूपाचा आरोप करत सांगितले की, अजित पवार यांच्या निवासस्थानाबाहेर ‘काळी जादू’ केल्याचा प्रकार घडल्याची माहिती समोर आली आहे. यामागे पक्षातील सत्तासंघर्ष कारणीभूत असू शकतो का, असा प्रश्‍न त्यांनी उपस्थित केला. त्यानंतर झालेल्या अपघाताबाबतही त्यांनी शंका व्यक्त करत, तो अपघात होता की घातपात, याचा सखोल तपास व्हावा अशी मागणी केली. तसेच काही केंद्रीय नेत्यांनी दिलेल्या वक्तव्यांचा संदर्भ देत, पक्षातील बदल आधीच ठरवले गेले होते का, याबाबतही त्यांनी प्रश्‍न उपस्थित केले. घटनाक्रम पाहता काही गोष्टी पूर्वनियोजित असल्याचा संशय बळावत असल्याचे त्यांनी म्हटले. रोहित पवार यांनी सांगितले की, या सर्व प्रकरणाची स्वतंत्र आणि सखोल चौकशी होणे आवश्यक आहे. यासाठी गुन्हे अन्वेषण विभागामार्फत तपास व्हावा, अशी मागणी त्यांनी केली. या संदर्भात तक्रार दाखल करण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले असून, संबंधित तपास महाराष्ट्र पोलिसांकडे सोपवण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.


पक्षाची घटना बदलत संपूर्ण पक्ष ताब्यात घेण्याचा प्रयत्न
राष्ट्रवादी काँगे्रस पक्षाची घटना बदलत संपूर्ण पक्ष ताब्यात घेण्याचा प्रयत्न प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी केल्याचा गंभीर आरोप रोहित पवार यांनी केला. यावेळी बोलताना रोहित पवार म्हणाले की, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे तसेच ब्रिजमोहन श्रीवास्तव आणि आणखी एका व्यक्तीच्या सह्या आहेत. या सह्या कशावर त्यांनी केल्या आहेत, एकतर त्यांनी खोटे सांगितले की त्यांची घटना जे आहे, प्रत्येक पक्षाची एक घटना असते. हे बदलण्यात आले आहे. त्यात जे कार्याध्यक्ष असतील त्यांना पक्षाचे पूर्ण अधिकार दिले जातील. पुढे रोहित पवार म्हणाले, म्हणजे अजितदादांना जाऊन फक्त 18 दिवस झाले होते आणि 16 फेब्रुवारी रोजी हे पत्र सुनेत्रा काकींना न सांगता, पार्थ पवारला न सांगता, बाकी आमदारांना विश्‍वासात न घेता हे पत्र इलेक्शन कमिशनला देण्यात आल्याचा आरोप करण्यात आला.

COMMENTS