Homeताज्या बातम्या

केरलच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या घरावर ईडीचे छापे; मुलीच्या माहिती-तंत्रज्ञान कंपनीशी संबंधित आर्थिक गैरव्यवहार प्रकरण

तिरुवनंतपुरम : केरलचे माजी मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्या निवासस्थानी बुधवारी अंमलबजावणी संचालनालय अर्थात 'ईडी'ने (ED) मोठी कारवाई केली. आर्थिक

झारखंडचे मुख्यमंत्री सोरेन यांचीदोषमुक्तीची याचिका न्यायालयाने फेटाळली
भोंदू अशोक खरातचा ताबा ईडीकडे
रूपाली चाकणकरांना आता ईडीची नोटीसअशोक खरात प्रकरणात चौकशीला वेग
केरळमध्ये माजी मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांच्या घरावर ED चा छापा; मुलीच्या  कंपनीमुळे अडचणी वाढल्या - Marathi News | ED raids former Kerala CM Pinarayi  Vijayan's house ...

तिरुवनंतपुरम : केरलचे माजी मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्या निवासस्थानी बुधवारी अंमलबजावणी संचालनालय अर्थात ‘ईडी’ने (ED) मोठी कारवाई केली. आर्थिक गैरव्यवहार आणि कथित काळा पैसा व्यवहार प्रकरणाच्या तपासाअंतर्गत राज्यातील सुमारे दहा ठिकाणी एकाच वेळी छापे टाकण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

ही कारवाई विजयन यांची कन्या टी. वीणा यांच्या माहिती-तंत्रज्ञान (IT) क्षेत्रातील कंपनीशी संबंधित व्यवहारांवरून करण्यात आली. तपास यंत्रणेचे पथक सकाळी तिरुवनंतपुरममधील बेकरी जंक्शन परिसरातील निवासस्थानी दाखल झाले. त्यानंतर घर परिसरात सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली होती. अंमलबजावणी संचालनालयाकडून काळा पैसा प्रतिबंधक कायद्यांतर्गत (PMLA) तपास सुरू असून, ‘कोचीन मिनरल्स अँड रुटाईल लिमिटेड’ या कंपनीच्या आर्थिक व्यवहारांची चौकशी केली जात आहे.

संबंधित कंपनीकडून टी. वीणा यांच्या “एक्सालाॅजिक सोल्यूशन्स” या माहिती-तंत्रज्ञान कंपनीला २०१८ ते २०१९ या कालावधीत सुमारे १ कोटी ७२ लाख रुपये देण्यात आल्याचा आरोप आहे. तपास यंत्रणेनुसार, कोणतीही प्रत्यक्ष सेवा किंवा तांत्रिक सुविधा न देता हा खर्च दाखवण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर २०२४ मध्ये अंमलबजावणी संचालनालयाने गुन्हा नोंद करून तपास सुरू केला होता. दरम्यान, या प्रकरणात संबंधित कंपनीने केरल उच्च न्यायालयात धाव घेत तपास रद्द करण्याची मागणी केली होती. मात्र, न्यायालयाने मंगळवारी ही याचिका फेटाळून लावली. त्यानंतर अवघ्या एका दिवसात अंमलबजावणी संचालनालयाने झडती मोहीम हाती घेतल्याने राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापले आहे.

विजयन समर्थकांचा ईडी पथकावर हल्ला केरलचे माजी मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्या घरी छापा टाकण्यासाठी गेलेल्या ईडीच्या पथकावर सीपीआय (CPI) समर्थकांनी हल्ला केला. ईडीचे १२ सदस्यीय पथक तिरुवनंतपुरममधील बेकरी जंक्शन येथील विजयन यांच्या घरासह १० ठिकाणी मनी लाँड्रिंग प्रकरणात छापा टाकण्यासाठी पोहोचले होते. त्यावेळी विजयन आणि त्यांचे कुटुंब घरात उपस्थित होते. छाप्याची बातमी पसरताच मोठ्या संख्येने सीपीआय समर्थक घराबाहेर जमा झाले. ईडीचे पथक बाहेर पडत असताना जमावाने त्यांच्या गाड्यांवर दगड आणि काचेच्या बाटल्या फेकल्या. गाड्यांच्या काचा फोडण्यात आल्या आणि लाठीनेही हल्ला करण्यात आला.

COMMENTS