Homeताज्या बातम्या

भोंदू अशोक खरातच्या ‘लीला’ झळकणार पडद्यावर; अभिनेत्री दिपाली सय्यद महत्त्वाच्या भूमिकेत

मुंबई : राज्यभरात चर्चेत आलेल्या भोंदू अशोक खरात प्रकरणावर आधारित मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची माहिती समोर आली आहे. य

मुंबईत माटुंगा रेल्वे वर्कशॉपमध्ये मोठी आग; पाहा थरारक दृश्ये
इंधन पुरवठा सुरक्षित ठेवण्याचा शासनाचा प्रयत्न; पुरवठा विस्कळीत होईल अशी साठेबाजी टाळा : मुख्यमंत्री फडणवीस
मुंबईसह पुण्यातही पावसाची दमदार हजेरी
Ashok Kharat Movie: अशोक खरात प्रकरणावर चित्रपट; अभिनेत्री दीपाली सय्यद  यांना धमक्यांचे फोन? Deepali Sayyad receives threats over playing a role in  a film about Ashok Kharat

मुंबई : राज्यभरात चर्चेत आलेल्या भोंदू अशोक खरात प्रकरणावर आधारित मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची माहिती समोर आली आहे. या चित्रपटात अभिनेत्री तथा राजकीय क्षेत्रात सक्रिय असलेल्या दिपाली सय्यद महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार असल्याने चित्रपटाबाबत उत्सुकता वाढली आहे. त्या नेमकी कोणती भूमिका साकारणार याबाबीत विविध तर्कवितर्कांना उधाण आले असून, काही वर्तुळात त्या ‘चाकणकर’ यांच्या धर्तीवरील भूमिका साकारतील अशी चर्चा सुरू आहे.

भोंदू अशोक खरात याच्यावर अनेक महिलांची फसवणूक, मानसिक छळ तसेच आर्थिक गैरव्यवहार केल्याचे गंभीर आरोप झाले होते. या प्रकरणामुळे राज्यात मोठी खळबळ उडाली होती. समाजमाध्यमांवर या प्रकरणाशी संबंधित अनेक दृश्यफिती (व्हिडीओ) प्रसारित झाल्यानंतर हा विषय अधिक चर्चेत आला होता. या प्रकरणात काही राजकीय व्यक्तींची नावे चर्चेत आल्याने राजकीय वातावरणही तापले होते. याच पार्श्वभूमीवर आता या घटनांवर आधारित कथानक घेऊन चित्रपटाची निर्मिती होत असल्याचे सांगितले जात आहे.

अभिनेत्री दिपाली सय्यद यांनी एका वृत्तवाहिनीशी संवाद साधताना या चित्रपटात आपण कलाकार म्हणून सहभागी होणार असल्याची माहिती दिली. त्या म्हणाल्या, “एका लोकप्रिय दूरचित्रवाणी स्पर्धेनंतर मला या संपूर्ण प्रकरणाची माहिती समजली. समाजात अशा प्रकारे लोकांची दिशाभूल करणारे अनेक भोंदू सक्रिय असू शकतात. त्यामुळे नागरिकांनी जागरूक राहणे आवश्यक आहे. या विषयावर तयार होणाऱ्या चित्रपटात मी भूमिका साकारणार आहे. मात्र, चित्रपटाची संपूर्ण माहिती आणि माझी भूमिका याबाबत योग्य वेळी खुलासा करण्यात येईल.” चित्रपटाचे चित्रीकरण पुढील महिन्यापासून सुरू होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. निर्माते वेगळे असून, आपण केवळ कलाकार म्हणून या प्रकल्पात सहभागी असल्याचही दिपाली सय्यद यांनी स्पष्ट केले.

COMMENTS