Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नवाब मलिकांची अजित पवारांना साथ

सभागृहात सत्ताधारी बाकावर विराजमान

नागपूर ः राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनला गुरूवारी सुरूवात झाली आहे. पहिल्याच दिवशी विरोधकांनी सभागृहात शेतकरी प्रश्‍नांवर सत्ताधार्‍यांना घे

नवाब मलिकांचा बार फुसका, भाजपावर आरोप करणारे तोंडघशी (Video)
सोमय्यांची धमकी पोकळ, मीच अधिवेशनात पोलखोल करणार- नवाब मलिक (Video)
पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त – नवाब मलिक (Video)

नागपूर ः राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनला गुरूवारी सुरूवात झाली आहे. पहिल्याच दिवशी विरोधकांनी सभागृहात शेतकरी प्रश्‍नांवर सत्ताधार्‍यांना घेरण्याचा प्रयत्न केला. मात्र सर्वात मोठी बाब म्हणजे आमदार आणि माजी मंत्री नवाब मलिक कोणत्या गटात जातात, याची सर्वांनाच उत्सुकता होती, मात्र मलिकांनी गुरूवारी अजित पवारांना साथ देत आपली पुढील राजकीय भूमिका स्पष्ट केली आहे.
तुरुंगातून सुटका झाल्यानंतर अजूनही मलिकांनी आपली राजकीय भूमिका स्पष्ट केली नव्हती. मात्र अधिवेशनात त्यांनी सत्ताधार्‍यांच्या बाकावर बसल्याने चर्चांना उधाण आले आहे. नवाब मलिक यांनी अखेर अजित पवार गटाला पाठिंबा दिल्याचे स्पष्ट झाले आहे. राज्याच्या हिवाळी अधिवेशनाला नागपुरमध्ये सुरूवात होत आहे. 20 डिसेंबरपर्यंत हे अधिवेशन चालणार आहे. या अधिवेशनात सध्या मनी लाँड्रिंग प्रकरणात जामिनावर बाहेर असलेले राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक ही सहभागी झालेत. मात्र नवाब सभागृहात अजित पवार गटासोबत सत्ताधार्‍यांच्या बाकावर बसणार की शरद पवार गटाला पाठिंबा देत विरोधकांची भूमिका घेणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. मात्र सभागृहात नवाब मलिक यांनी सत्ताधारी नेत्यांच्या रांगेत बसत शरद पवार गटाला मोठा धक्का दिला. नवाब मलिक सर्वात शेवटी सत्ताधारी बाकांवर जाऊन बसले. त्यामुळे अजित पवार गटाला त्यांनी पाठिंबा दिल्याचे स्पष्ट झाले आहे. नवाब मलिक हे वर्षभरापासून अधिवेशनाच्या कामकाजात सहभागी नव्हते. तसेच त्यांनी तुरुंगातून बाहेर आल्यानंतरही अजित पवार गटात जाणार की शरद पवारांना साथ देणार याबाबत अधिकृत भूमिका जाहीर केली नव्हती. मात्र त्यांनी विधानसभा कामकाजाला हजेरी लावत शरद पवार गटाला धक्का दिला आहे. सभागृहात जाण्यापूर्वी ते अजित पवार गटाच्या अनिल पाटील यांच्या कार्यालयातही जाऊन बसले होते.

अधिवेशन संपताच मंत्रिमंडळ विस्तार – विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन संपताच मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे. नव्या विस्तारात अजित पवार गटाला आणखी एक कॅबिनेट मंत्रिपद आणि दोन राज्यमंत्रिपदे मिळण्याची शक्यता आहे. अजित पवार गटाकडून मकरंद आबा पाटील यांची कॅबिनेट मंत्रिपदी वर्णी लागणार असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.

COMMENTS