कर्जत : भाजपचे पदाधिकारी चरपटीनाथ उर्फ पप्पूशेठ पांडुरंग धोदाड व त्यांच्या कुटुंबियांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे खोटे व सूडबुद्धीने प्रेरित आहेत. असा आरोप करत जे खोटे गुन्हे दाखल केले आहे ते मागे घ्यावे अशी मागणी भारतीय जनता पक्षाच्या कर्जत तालुका पदाधिकाऱ्यांनी केली. कर्जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले.यावेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष सचिन पोटरे, उदयसिंह राजपूत, सुनील काळे, धनंजय आगम, काका अनारसे, अजित अनारसे, त्यांच्यासह पक्षाचे अनेक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या निवेदनात म्हटले आहे की, पूर्वीपासून जमिनीच्या बांधावरून संदीप शिवदास पाटील व चरपटीनाथ धोदाड यांच्यामध्ये भावकीतील वाद सुरू असून, या वादाचा सूड घेण्यासाठी संदीप शिवदास पाटील यांनी धोदाड कुटुंबियांवर खोटे, बनावट व सूडबुद्धीने प्रेरित गुन्हे दाखल केले. संदीप शिवदास पाटील यांनी चरपटीनाथ यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. संबंधित आरोपींना तात्काळ अटक करण्याची ठाम मागणी पदाधिकाऱ्यांनी यावेळी केली. निवेदनाच्या शेवटी, प्रकरणाची निष्पक्ष व पारदर्शक चौकशी करावी, सर्व तांत्रिक व वैद्यकीय पुराव्यांची सखोल पडताळणी व्हावी, खोटे गुन्हे तात्काळ रद्द करावेत, आणि खोटी तक्रार दाखल करणाऱ्यावर स्वतंत्र गुन्हा दाखल करावा अशी मागणी भाजपने केली आहे.

COMMENTS