Homeताज्या बातम्या

मोदी स्टेजवर येताच सुप्रिया सुळेंनी रोहित पवारांना पुढे आणलं; VIDEO व्हायरल

https://www.youtube.com/watch?v=szOmor3DDQ8 दिल्लीतील रेवती सुळे यांच्या लग्नाच्या स्वागत समारंभातील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच

लग्नाच्या आमिषाने युवतीची 13 लाखांची फसवणूक
नवनगरांच्या निर्मितीबाबत शासनाने स्पष्ट माहिती द्यावीआमदार आशुतोष काळे यांची विधिमंडळात मागणी
कोपरगाव मतदारसंघात नाला खोलीकरणाच्या कमाला वेग  

दिल्लीतील रेवती सुळे यांच्या लग्नाच्या स्वागत समारंभातील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे. या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांनी हजेरी लावली होती.पंतप्रधान मोदी वधू-वरांना शुभेच्छा देण्यासाठी स्टेजवर आल्यानंतर पवार कुटुंबातील तरुणांची त्यांच्याशी ओळख करून देण्यात आली. यावेळी युगेंद्र पवार यांनी मोदींची भेट घेतली.मात्र रोहित पवार मागे उभे असल्याचं पाहून सुप्रिया सुळे यांनी त्यांचा हात धरून त्यांना पुढे आणलं आणि मोदींसमोर उभं केलं. यानंतर रोहित पवार आणि पंतप्रधान मोदी यांच्यात काही वेळ संवादही झाला.रोहित पवार हे महायुती सरकारवर सातत्याने टीका करणाऱ्या नेत्यांपैकी एक आहेत. त्यामुळे मोदी आणि रोहित पवार यांच्यातील हा संवाद आणि सुप्रिया सुळे यांनी त्यांना पुढे आणल्याचा क्षण सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे.

COMMENTS