Homeताज्या बातम्या

नियमित कर्जदार, विमा व जमिनींच्या प्रश्नासाठी किसान सभेचे राज्यभर जेल भरो आंदोलन

https://www.youtube.com/watch?v=oJyFGy5Wg_s नियमित कर्जदार शेतकऱ्यांना 2 लाख रुपये प्रोत्साहन अनुदान द्या, पीक विम्याचे ट्रिगर पुन्हा लागू क

अकोलेत ‘फुलोकी होली’ समारंभ उत्साहात
महिलेने स्वतः सक्षम होणे गरजेचे : ऋतुजा गायकवाड
विचारांचा दुष्काळ दूर करण्यासाठी ज्ञानेश्वरीची रचना : हभप म्हस्के

नियमित कर्जदार शेतकऱ्यांना 2 लाख रुपये प्रोत्साहन अनुदान द्या, पीक विम्याचे ट्रिगर पुन्हा लागू करा, वन, देवस्थान, गायरान, वरकस व घरांच्या तळ जमिनी नावे कराव्यात या मागण्यांसाठी आज राज्यातील 23 जिल्ह्यात हजारो शेतकऱ्यांनी तीव्र व व्यापक निदर्शने करून जेल भरो आंदोलने करण्यात आली.

ठाणे-पालघर, नाशिक, अहिल्यानगर, सांगली, कोल्हापूर, सातारा, पुणे, बीड, परभणी, नांदेड, वर्धा, यवतमाळ, अमरावती, बुलडाणा, नंदुरबार आदी 23 जिल्ह्यांमध्ये आंदोलने करून निवेदने देण्यात आली. सरकारने आंदोलनाची दखल न घेतल्यास किसान सभेच्या नेतृत्वाखाली दिनांक 20 ऑगस्ट रोजी राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या घरासमोर भव्य बेमुदत राज्यव्यापी महामुक्काम आंदोलन सुरू करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.

COMMENTS