Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सातारच्या वैद्यकीय महाविद्यालयासह रुग्णालयाच्या कामाची जिल्हाधिकार्‍यांकडून पहाणी

सातारा / प्रतिनिधी : सातारा येथील छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण झाले आहे. या कामाची पह

टेंभूच्या पाणी योजनातून हजारो हेक्टर क्षेत्र ओलीताखाली येणार; आगामी काळात प्रभाकर देशमुखांच्या नेतृत्वाखाली माण-खटावचे प्रश्‍न मार्गी लावणार : ना. अजित पवार
बेपत्ता झालेले पोलिस निरीक्षक संग्राम ताडे शिरवळमध्ये बेशुध्द अवस्थेत
पुण्यातील पुरंदर विमानतळाचा वाद चिघळणार; ड्रोन सर्व्हे बंद पाडणार्‍या शेतकर्‍यांवर होणार कारवाई

सातारा / प्रतिनिधी : सातारा येथील छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण झाले आहे. या कामाची पहाणी जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी केले. यावेळी वैद्यकीय महाविद्यलायाचे अधिष्ठाता डॉ. रविंद्रनाथ चव्हाण, कार्यकारी अभियंता श्रीपाद जाधव उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी पाटील म्हणाले, हे वैद्यकीय महाविद्यालय 100 विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे व 500 रुग्णांसाठी सुविधा उपलब्ध करून देणारे आहे. महाविद्यालयातील तज्ज्ञ डॉक्टरांमुळे जिल्ह्यातील गरजू व गरीब लोकांना आरोग्य सुविधा चांगल्या मिळणार आहेत. त्यामुळे महाविद्यालयाची उर्वरित कामे जलद गतीने पूर्ण करावी.
पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले आहे. दुसर्‍या व तिसर्‍या टप्प्याचे ही काम लवकरात लवकर पूर्ण करावे, असे सांगून जिल्हाधिकारी पाटील यांनी आत्तापर्यंत वैद्यकीय महाविद्यालयाच्या कामांना किती निधी आला, खर्च किती झाला, याची माहिती घेतली. स्टाफ क्वॉटर, कॅटींगची पहाणी केली. बांधकामाबाबत कोणतीही अडचण असल्यास थेट आपल्याशी संपर्क करावा, असेही पहाणी दरम्यान पाटील यांनी सांगितले.

COMMENTS