Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शेतकर्‍यांना 25 लाख ऊसाची रोपे उपलब्ध करून देणार : सुजयकुमार पाटील

इस्लामपूर / प्रतिनिधी : ऊस उत्पादक शेतकर्‍यांचे ऊसाचे एकरी उत्पादन वाढविण्यासाठी राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखाना शेतकर्‍यांना 25 लाख शुध्द ऊस र

करोडी येथील शेतकऱ्यांच्या 350 पपईच्या झाडांचे अज्ञाताने केले नुकसान 
शेतकरी संघटनेच्या वतीने निवासी कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिराचे आयोजन
शेतकऱ्यांनी ड्रॅगन फळाची शेती करावी शेतकऱ्यांना कृषी विभागामार्फत आवाहन

इस्लामपूर / प्रतिनिधी : ऊस उत्पादक शेतकर्‍यांचे ऊसाचे एकरी उत्पादन वाढविण्यासाठी राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखाना शेतकर्‍यांना 25 लाख शुध्द ऊस रोपे उपलब्ध करून देणार आहे. ऊस उत्पादन वाढीत शुध्द बियाणे, खत व पाण्याचे योग्य नियोजन महत्वाचे आहे. शेतकर्‍यांनी बाळ भरणी करावी. यातून एकरी 4-5 टन ऊसाचे उत्पादन वाढू शकते, असा विश्‍वास कारखान्याचे ऊस विकास अधिकारी सुजयकुमार पाटील यांनी इस्लामपूर येथे व्यक्त केला.
राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याच्या वतीने या प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी राजारामबापू सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रा. शामराव पाटील यांच्या हस्ते लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करून शिबिराचा शुभारंभ करण्यात आला. शेती समितीचे अध्यक्ष विठ्ठल पाटील, संचालक शैलेश पाटील, माजी नगराध्यक्ष पै. भगवान पाटील, संचालक हणमंतराव माळी, युवराज पाटील, कलाकार मानधन समितीचे माजी अध्यक्ष एम. जी. पाटील, अ‍ॅड. संपतराव पाटील, आनंदराव पाटील प्रामुख्याने उपस्थित होते.
सुजयकुमार पाटील म्हणाले, माजी मंत्री आ. जयंत पाटील यांचे मार्गदर्शन व कारखान्याचे अध्यक्ष प्रतिक पाटील यांच्या संकल्पनेतून शेतकर्‍यांना नवनवीन तंत्रज्ञान उपलब्ध करून दिले जात आहे. कारखान्याच्या माध्यमातून शेतकर्‍यांच्या हिताच्या विविध योजना राबविल्या जात आहेत. शेतकर्‍यांना कमी दरात जैविक, सेंद्रिय खते तसेच कमी दरात माती परिक्षण करून दिले जात आहे. शेतकर्‍यांनी खोडवा, नेडवा ऊस पिक घ्यावे. यामध्ये खर्चाची बचत होते. खोडवा पिकाचे योग्य नियोजन केल्यास चांगले उत्पादन मिळते.

COMMENTS