Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

वाघोलीत मित्राचा खून करणार्‍या दोन कामगारांना अटक

पुणे : पैशांच्या व्यवहारावरून झालेल्या वादात मित्राचा खून करुन पसार झालेल्या दोन कामगारांना लोणीकंद पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने दोघा आरोपींना

भव्य शोभायात्रेने संत बंकटस्वामी महाराजांच्या 82 व्या पुण्यतिथी सोहळ्याची थाटात सुरुवात; निनगुर गावात काय वाजत गाजत… बंकटस्वामींचा सोहळा गाजत..! जयघोषाने परिसर दुमदुमला
सहकार महर्षी शंकरराव कोल्हे यांना येवलावासियांनी वाहिली श्रद्धांजली |
विशाळगडावरील कार सेवा तात्पुरती स्थगित

पुणे : पैशांच्या व्यवहारावरून झालेल्या वादात मित्राचा खून करुन पसार झालेल्या दोन कामगारांना लोणीकंद पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने दोघा आरोपींना 28 ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. वाघोली येथील केसनंद रस्त्यावर सिट्रॉन सोसायटीसमोर ही घटना घडली होती. शैलेंद्र अप्पा मंडगीकर (वय 22, रा. लेबर कॅम्प, केसनंद रस्ता, वाघोली) असे खून झालेल्या कामगाराचे नाव आहे. राम सुभाष श्रीरामे (वय 22, रा. बेरळी बुद्रूक, ता. देगलूर, जि. नांदेड) आणि गोपाल ज्ञानोबा कोतलापुरे (वय 26, रा. नांदेड नाका, लातूर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

COMMENTS