Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

प्रशासकीय अधिकारी आणि पत्नींच्या संस्थेमार्फत शिलाई मशीन्सचे वितरण

मुंबई, दि. ९ – प्रशासकीय अधिकारी व त्यांच्या पत्नींची संघटना आयएएसओडब्ल्यूए (IASOWA) ही अखिल भारतीय स्तरावर कार्यरत असलेली ना नफा तत्वा

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६: पात्र लाभार्थ्यांच्या याद्या लवकरच प्रसिद्ध होणार! आधार प्रमाणीकरणाचे आवाहन
दिल्ली येथील राष्ट्रीय तायक्वादो स्पर्धेत  लोह्याच्या वर्षा तोंडारेची कास्यपदाकाची कमाई
राजूर पोलिस स्टेशन वतीने दंगा काबू प्रात्यक्षिक

मुंबई, दि. ९ – प्रशासकीय अधिकारी व त्यांच्या पत्नींची संघटना आयएएसओडब्ल्यूए (IASOWA) ही अखिल भारतीय स्तरावर कार्यरत असलेली ना नफा तत्वावर सामाजिक कार्यासाठी कटिबद्ध असलेली संस्था आहे. या संस्थेच्या महाराष्ट्र शाखेमार्फत शोभा अरुण नाईक आणि यास्मिन फिरोज मोमिन या स्वयंसाहाय्य गटातील दोन विधवा महिलांना शिलाई आणि कटर मशीनचे वितरण करण्यात आले. आयडीबीआयच्या सौजन्याने सीएसआरच्या माध्यमातून या मशीन्स देण्यात आल्या आहेत.

शुक्रवारी मुंबईत आयोजित एका कार्यक्रमात या मशीन्सचे वितरण करण्यात आले. यावेळी संस्थेच्या अध्यक्ष श्रीमती अर्चना मीना, सचिव श्रीमती आर.विमला, खजिनदार झेबा नाईक, सुप्रिया छडगल यांच्यासह संस्थेच्या पदाधिकारी आणि सदस्य तसेच आयडीबीआयचे पदाधिकारी उपस्थित होते.

COMMENTS