श्रीरामपूर - नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील दोंडी येथील कुंभार समाजातील संगीता मधुकर जाधव यांच्या हत्येचा श्रीरामपूर येथील श्रीसंत गोरा कुं
श्रीरामपूर – नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील दोंडी येथील कुंभार समाजातील संगीता मधुकर जाधव यांच्या हत्येचा श्रीरामपूर येथील श्रीसंत गोरा कुंभार प्रतिष्ठान, वाचन संस्कृती प्रतिष्ठान आणि श्रीरामपूर साहित्य परिवाराच्या वतीने निषेध करण्यात आला. यावेळी संगीता जाधव यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
यावेळी श्रीसंत गोरा कुंभार प्रतिष्ठानचे संस्थापक तथा ज्येष्ठ साहित्यिक डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले. कुंभार समाज शांतताप्रिय आणि कष्टकरी असून, समाजातील महिलेची अशा प्रकारे हत्या होणे तसेच अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराची घटना अत्यंत गंभीर असल्याचे त्यांनी सांगितले. या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई होण्याची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले. संगीता जाधव यांच्या बहिणीने धाडसाने प्रकरण पुढे आणल्याबद्दल डॉ. उपाध्ये यांनी त्यांचे कौतुक केले.
प्रतिष्ठानचे मार्गदर्शक तथा साहित्यिक प्रा. विलासराव तुळे यांनीही घटनेबद्दल दुःख व्यक्त केले. संगीता जाधव यांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी सर्व समाजाने उभे राहून त्यांना आधार द्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी पीएसआय मेजर नंदकुमार सैंदोरे, प्रा. पल्लवी सैंदोरे, सुमनबाई मांढरे, चंद्रकला सैंदोरे, मंदाकिनी उपाध्ये, नितीन जोर्वेकर, माधुरी जोर्वेकर, कचरू जोर्वेकर, जयश्री जोर्वेकर, चेतन तुळे, श्रद्धा तुळे, रवींद्र सैंदोरे, कृष्णा सैंदोरे, मानसी सैंदोरे, निर्मिक गणेशानंद उपाध्ये, श्रीराम सैंदोरे, आराध्या सैंदोरे, धनश्री सैंदोरे आदी उपस्थित होते.
दरम्यान, या प्रकरणातील दोषींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी श्रीसंत गोरा कुंभार प्रतिष्ठानच्या पदाधिकारी व सदस्यांनी केली.

COMMENTS