Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अहमदनगर जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राचे लोकार्पण

अहमदनगर : डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन संचलित जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राचे 7 मार्च रोजी लोकार्पण करण्यात आले. सामाजिक न्यायमंत्री डॉ.

कालिका फर्निचरच्या ग्राहकांना विमा संरक्षणाचा लाभ
धारणगाव, कुंभारीच्या मुस्लिम दफनभूमीचा प्रश्‍न मार्गी
स्पर्धेत भाग घेतल्यानेच विद्यार्थ्यांची होईल प्रगती : देवदान कळकुंबे

अहमदनगर : डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन संचलित जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राचे 7 मार्च रोजी लोकार्पण करण्यात आले. सामाजिक न्यायमंत्री डॉ. विरेंद्र कुमार यांच्या शुभ हस्ते  पुनर्वसन केंद्राचे दृकश्राव्य पद्धतीने लोकार्पण करण्यात आले. यावेळी डॉ. विरेंद्र कुमार म्हणाले की, केंद्र सरकार हे प्रत्येक दिव्यांग पुनर्वसन केंद्र सर्व दृष्टीने सक्षम करणार आहेत. दिव्यांग व्यक्तींना सक्षम करण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध आहे. या कार्यक्रमासाठी सामाजिक न्याय विभागाच्या राज्यमंत्री प्रतिमा भौमिक, आयएएस राजेश अग्रवाल यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.      
पुनर्वसन केंद्राने स्वतःचे संकेत स्थळ व मोबाईल अ‍ॅप बनवले असून नगर जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींना सर्व सुविधा एका क्लिक वर उपलब्ध करून दिल्या आहेत. दररोज या केंद्रामार्फत 14-15 दिव्यांग मुलांना भौतिक उपचार व वाचा उपचार दिले जातात. कृत्रिम अवयव तयार करण्यासाठी सुसज्ज विभाग असून दिव्यांग बांधवाना इडिप, सिपडा व महात्मा फुले जन आरोग्य योजनेतून कृत्रिम अवयव मोफत दिले जातात. पुनर्वसन केंद्राने जिल्ह्यातील दिव्यांगांचे सर्वेक्षण सुरु केले असून याद्वारे राज्य व केंद्र सरकारच्या सर्व योजना गरजूंपर्यंत पोहचविता येणार आहेत.  जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राने मागील दोन वर्षात 7147 दिव्यांग व्यक्तींना मा. खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनात इडिप योजनेअंतर्गत सहायक साधनांचे वाटप केले आहे. राष्ट्रीय वयोश्री योजने अंतर्गत 2022-23 मध्ये सुमारे 37117 वयोवृद्ध व्यक्तींना सहायक साधनांचे वाटप करून या योजनेचा देशपातळीवर एक विक्रम प्रस्थापित केला. या कार्याबद्दल देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांनी हि पुनर्वसन केंद्राचे पत्राद्वारे अभिनंदन केले होते.  या लोकार्पण कार्यक्रमासाठी प्रशासक म्हणुन स्वानंदकुमार पांढरे, आलियावर जंग इन्स्टिटयूट, तसेच जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्रांचे संचालक डॉ. अभिजित दिवटे, डॉ. पाडुरंग गायकवाड महासचिव, विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन, डॉ. पडळकर, डॉ. दिपक अनाप, प्रकल्प समन्वयक, जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र तसेच डॉ. अभिजीत मेरेकर प्रकल्प समन्वयक जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र व डॉ. प्रसाद काजळे आदी उपस्थित होते.

COMMENTS