Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

इराणच्या अणुऊर्जा केंद्रावर अमेरिकेचा हल्ला!; ‘बंकर बस्टर’ बॉम्बद्वारे हल्ला केल्याचा ट्रम्प यांचा दावा

वॉशिंग्टन : पश्‍चिम आशियातील तणाव अधिक तीव्र झाला असून अमेरिकेने इराणच्या अणुऊर्जा केंद्रावर थेट हल्ला करून भूमिगत अणुऊर्जा सुविधा नष्ट करण्यासाठ

इराणच्या तेलावर अमेरिकेची नजर; खार्ग बेट ताब्यात घेण्याची ट्रम्प यांची धमकी
होर्मुझ सामुद्रधुनीत इराणचा पुन्हा एकदा तेल टँकरवर भीषण हल्ला
इराणच्या युद्धात हुथी बंडखोर सहभागी; येमेनमधून इस्रायलवर केला क्षेपणास्त्र हल्ला

वॉशिंग्टन : पश्‍चिम आशियातील तणाव अधिक तीव्र झाला असून अमेरिकेने इराणच्या अणुऊर्जा केंद्रावर थेट हल्ला करून भूमिगत अणुऊर्जा सुविधा नष्ट करण्यासाठी वापरल्या जाणार्‍या बंकर-बस्टर बॉम्बचा वापर करण्यात आल्याचे वृत्त आहे. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मंगळवारी पहाटे इराणमधील महत्त्वाच्या इस्फहान शहरावर ‘बंकर बस्टर’ बॉम्बद्वारे शक्तिशाली स्फोटकांनी हल्ला केल्याचा दावा केला आहे. इराणच्या शस्त्रास्त्र डेपोवर हल्ला केल्यामुळे संघर्ष तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
या व्हिडिओमध्ये सलग प्रचंड स्फोट होताना दिसतात. स्फोटांनंतर निर्माण झालेल्या भीषण आगीमुळे रात्रीचे आकाश नारंगी प्रकाशाने उजळून निघाल्याचे स्पष्टपणे जाणवते. धक्कातरंगांच्या तीव्रतेमुळे परिसर हादरल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र, या व्हिडिओबाबत कोणताही अधिकृत संदर्भ देण्यात आलेला नसल्याने त्याच्या सत्यतेबाबत प्रश्‍नचिन्ह उपस्थित होत आहे. माध्यमांच्या विविध अहवालांनुसार, हा हल्ला इस्फहानमधील मोठ्या दारुगोळा साठा केंद्रावर झाला असल्याचा दावा करण्यात येत आहे. काही अहवालांमध्ये अमेरिका आणि इस्रायलने संयुक्तपणे ही कारवाई केल्याचेही म्हटले आहे. इस्फहान हे सुमारे तेवीस लाख लोकसंख्या असलेले इराणमधील औद्योगिक व सामरिकदृष्ट्या महत्त्वाचे शहर असून येथे लष्करी तळ आणि संवेदनशील सुविधा आहेत. अधिकृत सूत्रांच्या हवाल्याने असेही सांगितले जात आहे की सुमारे दोन हजार पाउंड (अंदाजे नऊशे सात किलोग्रॅम) वजनाच्या भेदक स्फोटकांचा वापर करण्यात आला. ही स्फोटके जमिनीखालील बंकर किंवा मजबूत संरचना भेदण्यासाठी तयार केली जातात. त्यामुळे हल्ल्याचा उद्देश भूमिगत साठे किंवा सुविधा उद्ध्वस्त करणे असा असू शकतो, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. या हल्ल्यानंतर सलग स्फोटांची मालिका सुरू झाल्याचेही काही अहवालांत नमूद करण्यात आले आहे. यामुळे परिसरात प्रचंड अग्निगोळे निर्माण झाले आणि मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तथापि, अधिकृत स्तरावर जीवितहानी किंवा हानीचे अचूक स्वरूप अद्याप स्पष्ट करण्यात आलेले नाही.


इस्फहानमधील भूमिगत ठिकाण केंद्रस्थानी
इराणने अण्वस्त्र कार्यक्रम राबवण्यासाइी युरेनियमचा साठा इस्फहानमधील भूमिगत ठिकाणी हलवला असण्याची शक्यता व्यक्त होती. त्यामुळेच अमेरिकेने या शहरावर हल्ला करत अण्वस्त्र साठा नष्ट करण्यासाठी हल्ला केल्याचे बोलले जात आहे. याआधीही गेल्या वर्षी अशाच प्रकारच्या कारवाईत या शहराला लक्ष्य करण्यात आल्याचे वृत्त होते, ज्यामागे अणु-सुविधांवर परिणाम करण्याचा उद्देश असल्याचे सांगितले गेले होते. या संपूर्ण प्रकरणामुळे पश्‍चिम आशियातील सुरक्षा परिस्थिती अधिकच अस्थिर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. अधिकृत पुष्टी, आंतरराष्ट्रीय प्रतिक्रिया आणि पुढील घडामोडींकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

COMMENTS