Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अधिवेशनात अभूतपूर्व गोंधळ दिशा सालियान मृत्यू प्रकरणी होणार एसआयटी चौकशी

राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटलांचे अधिवेशनापुरते निलंबन

नागपूर/प्रतिनिधी ः हिवाळी अधिवेशनाचा कालचा दिवस अभूतपूर्व गोंधळाचा ठरला. दिशा सालियान मृत्यूप्रकरणी थेट आदित्य ठाकरे यांच्यावर आरोप, तर विरोधकांन

Jalna : शिवसेनेत आग लावण्याचं काम माझं नाही – रावसाहेब दानवे | LOKNews24
कृषी खात्यातील योजना प्रत्यक्षात उतरवा ः आ. राजळे
Beed : पाटोदा नगर पंचायतीच्या विरोधात नागरिकांचे धरणे आंदोलन (Video)

नागपूर/प्रतिनिधी ः हिवाळी अधिवेशनाचा कालचा दिवस अभूतपूर्व गोंधळाचा ठरला. दिशा सालियान मृत्यूप्रकरणी थेट आदित्य ठाकरे यांच्यावर आरोप, तर विरोधकांनी पूजा चव्हाणच्या मृत्यूची केलेली चौकशीची मागणी, भूखंड घोटाळा, त्यातच राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी विधानसभा अध्यक्षांबद्दल वापरलेले अपशब्द यानंतर त्यांचे अधिवेशनापुरते केलेले निलबंन यामुळे विधिमंडळाचा कालचा दिवस विशेष गाजला.


अभिनेता सुशांत सिंह राजपूत आणि दिशा सालियान मृत्यू प्रकरण आणि शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी लोकसभेत रिया चक्रवर्तीच्या मोबाईलवर आलेले एयु नाव असलेले कुणाचे फोन आले होते, एयूचा अर्थ आदित्य ठाकरे देखील होतो, असा दावा बिहार पोलिसांनी केल्याचे सांगत शेवाळे यांनी खळबळ उडवून दिली होती. त्यानंतर याप्रकरणाचे गुुरूवारी विधिमंडळात देखील पडसाद उमटले. अखेर दिशा सालियान मृत्यू प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी करणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेत सांगितले. तसेच कोणाकडे याप्रकरणी पुरावे असतील तर ते एसआयटीकडे द्यावेत असेही फडणवीस यांनी आवाहन केले.
दिशा सालियन प्रकरणावरून सभागृहात प्रचंड गदारोळ झाला. त्यामुळे सभागृह तीनवेळा तहकूब करण्यात आले. त्यानंतर दिशा सालियन प्रकरणांची एसआयटीमार्फत चौकशी करणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली आहे. सध्या ही केस पोलिसांकडे असून कुणाकडे काही पुरावे असतील तर ते द्यावेत, असेही देवेंद्र फडणवीस म्हणालेत. देवेंद्र फडणवीस म्हणाले, दिशा सालियन मृत्यू प्रकरणी पोलिसांकडे केस सुरु आहे. या प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी करण्यात येणार आहे. ज्यांच्याकडे याचे पुरावे आहेत त्यांनी ते द्यावे. दिशा सालियन केस कधीही सीबीआयकडे गेली नाही. सुशांतसिंग यांची केस सीबीआयकडे होती. नवीन पुरावे आले असतील तर त्यांची चौकशी केली जाईल. दरम्यान, अभिनेत्री रिया चक्रवर्तीच्या फोनवर 44 कॉल ‘एयू’ नावाने आले असल्याची माहिती लोकसभेत शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी दिली आहे. ‘एयू’ (एयू) म्हणजे, आदित्य उद्धव असे बिहार पोलिसांनी सांगितल्याची माहिती खासदार राहुल शेवाळेंनी दिली. यामुळे दिशा सालियान मृत्यूप्रकरणी चौकशी होण्याची मागणी होत आहे.

आदित्य ठाकरेंच्या अडचणी वाढणार –
शिंदे गटाच्या आरोपांनंतर आदित्य ठाकरेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. राहुल शेवाळेंच्या वक्तव्यानंतर शिंदे सरकार आक्रमक झाले आहे. सुशांत सिंग राजपूत आणि दिशा सॅलियन आत्महत्या प्रकरणाचा संपूर्ण अहवाल केंद्राकडून मागवणार असून याप्रकरणी नेमलेली एसआयटी तपास करणार आहे. या संपूर्ण प्रकरणाची पुन्हा चौकशी होणार आहे. दिशा सालियन मृत्यूचा मुद्दा भरत गोगावलेंकडून विधानसभेत उपस्थित करण्यात आला. मृत्यूआधी दिशासोबत कोण कोण होते? दिशाच्या मृत्यूचे गूढ कधी उकलणार? असा सवाल गोगावलेंनी सभागृहात उपस्थित केला.

…तर, पुजा चव्हाणच्या मृत्यूची चौकशी करा ः अजित पवार
विरोधी पक्ष नेते अजित पवार म्हणाले, दिशा सालियन हयात नसताना त्याबद्दल आणखी बोलून बदनाम करायचे नाही. तिच्या आई वडिलांनी हात जोडून विनंती केली, आम्हाला आता जगू द्या, दिशाला बदनाम केले जात आहे. ती आम्हाला सोडून गेली आहे. दिशा सालियनची चौकशी करायचे असेल तर पुजा चव्हाणची देखील चौकशी करा. चौकशी करायची असेल तर सर्वच चौकशी करता येईल. फक्त राजकारण करु नका, असे अजित पवारांनी खडसावून सांगितले.

निलंबनांनंतर जयंत पाटलांचा संताप – राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचं निलंबन करण्यात आल्यानंतर महाविकास आघाडी आक्रमक झाली आहे. विधानसभा अध्यक्षांना उद्देशून अपशब्द वापरल्यामुळे जयंत पाटील यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. हिवाळी अधिवेशन संपेपर्यंत जयंत पाटील यांचे निलंबन असणार आहे. यानंतर जयंत पाटील यांनी ट्विट केले असून सरकारवर ताशेरे ओढले आहेत. जयंत पाटील यांनी ट्विट केले असून या निर्लज्ज सरकारविरोधात लढत राहणार असे म्हटले आहे. या निर्लज्ज सरकारविरोधात लढत राहणार. बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज की जय, असे म्हटले आहे.

COMMENTS