Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

स्वतःची उद्योजकीय मानसिकता विकसित करा – अभिनाथ शिंदे

पाथर्डी प्रतिनिधी - चैतन्य अर्बन को ऑप क्रेडिट सोसायटी लि.च्या कॉर्पोरेट ऑफिस व प्रगती व्यासपीठ कॉन्फरन्स हॉलचे लोकार्पण दि व्यंकटेश ग्रुपचे अध्

मोटारसायकलवरील मधल्याने महिलेचे गंठण धूमस्टाईलने पळविले
औषधनिर्माण क्षेत्रात कुशल मनुष्यबळ घडवणारे केंद्र
श्री साईबाबा संस्थान अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा

पाथर्डी प्रतिनिधी – चैतन्य अर्बन को ऑप क्रेडिट सोसायटी लि.च्या कॉर्पोरेट ऑफिस व प्रगती व्यासपीठ कॉन्फरन्स हॉलचे लोकार्पण दि व्यंकटेश ग्रुपचे अध्यक्ष अभिनाथ शिंदे यांच्या हस्ते गुरुवारी संपन्न झाला. यावेळी शिंदे यांनी मनोगतातून व्यावसायीक व उद्योजक यातील मोठी तफावतीची मांडणी करत आपली स्वतःची उद्योजकीय मानसिकता आपण जोपर्यंत विकसित करत नाहीत तोपर्यंत आपण उद्योजक होऊ शकत नाही हा मूलमंत्र उपस्थितांना दिला.

          या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मोहटादेवी देवस्थानाचे विश्वस्त डॉ श्रीधर देशमुख होते,प्रमुख पाहुणे म्हणून स्वामी समर्थ विद्यालयाचे प्राचार्य श्री एकनाथ ढोले सर,चैतन्य ग्रुपचे अनंत ढोले,अजिंक्य उर्फ गुंडू खेडकर,बंडू आंधळे व मोठ्या संख्येने उद्योजक उपस्थित होते.

COMMENTS