Homeताज्या बातम्या

चापडगावमध्ये सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात

भातकुडगावफाटा प्रतिनिधी ः चापडगाव हायस्कूल चापडगावमध्ये सावित्रीबाई फुले जयंती साजरी करण्यात आली .या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाच्या ज

नैसर्गिक शेतीच्या विस्तार कार्यात बाभळेश्‍वर केंद्राचे कार्य दिशादर्शक
डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी महाविद्यालयास ‘अ’ दर्जा
LOK News 24 । ‘फक्त हिंदू सणांनाच ठाकरे सरकारची आडकाठी का

भातकुडगावफाटा प्रतिनिधी ः चापडगाव हायस्कूल चापडगावमध्ये सावित्रीबाई फुले जयंती साजरी करण्यात आली .या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाच्या जेष्ठ शिक्षिका श्रीमती मंदाकिनी खंडागळे होत्या. विद्यालयाचे प्राचार्य गणपत शेलार यांनी स्त्री शिक्षणाचे महत्व सांगितले. विद्यालयाची पर्यवेक्षक व संस्था प्रतिनिधी सुनील जायभाये यांची प्रमुख उपस्थिती होती.
कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्रा. विद्यावर्धिनी मुळे यांनी सावित्रीबाई फुले यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवावा व कार्य करावे असे उद्गार काढले. तसेच श्रीमती भाग्यश्री घुगे यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवन कार्याची माहिती दिली. छात्रअध्यापिका शेख  तरन्नुम यांनी सावित्रीबाई फुले यांचे शैक्षणिक व सामाजिक कार्य सांगितले. यावेळी विद्यालयातील विद्यार्थी भावेश लोहकरे हा महात्मा जोतिबा फुले यांच्या वेशभूषेत  व वेदिका लोहकरे कु. गरजे  साक्षी ही सावित्रीबाई यांच्या वेशभूषेत होती. विद्यालयातील विद्यार्थिनी  सावित्रीबाई फुले यांच्या वेशभूषेत येऊन त्यांचे कार्य सांगितले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन छात्र अध्यापिका शेख समरिन यांनी केले व आभार छात्र अध्यापिका पवार सोनाली यांनी यांनी मानले या कार्यक्रमासाठी विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

COMMENTS