Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

तालुक्यातील घुमटवाडी येथे संत सेवालाल महाराज जयंतीनिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आणि स्पर्धाचे आयोजन

पाथर्डी प्रतिनिधी - संत सेवालाल महाराज यांच्या २८४ व्या जयंती निमित्त तालुक्यातील घुमटवाडी येथे विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे व स्पर्धेचे आयोज

ट्रक धडकेत निवडणूक प्रशिक्षणार्थी शिक्षक जखमी
नागरिकांनी नियम पाळले नाही तर लोकडाऊन अटळ – जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले
‘वंचित’च्या वतीने आयोजित सोलो डान्स स्पर्धा उत्साहात

पाथर्डी प्रतिनिधी – संत सेवालाल महाराज यांच्या २८४ व्या जयंती निमित्त तालुक्यातील घुमटवाडी येथे विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे व स्पर्धेचे आयोजन ग्रामस्थांच्या वतीने करण्यात येवून सेवालाल महाराज जयंती मोठ्या उत्साहात  साजरी करण्यात आली. यावेळी ग्रामस्वच्छता अभियाना अंतर्गत गावाची स्वछता करण्यात आली, रांगोळी स्पर्धा मध्ये मनमोहक रांगोळीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले,चित्रकला,वृक्षारोपण,

वेशभूषा आदी स्पर्धा व उपक्रमांचे आयोजन यावेळी उत्सव समितीच्या वतीने करण्यात आले होते. यावेळी ग्रामस्थांच्या हस्ते सेवालाल महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.यावेळी रक्तदान शिबाराचे देखील आयोजन करण्यात आले होते,विक्रमी संखेने तरुणांनी रक्तदान करत नवीन आदर्श उभा केला आहे.यावेळी घुमटवाडी येथील भजनी मंडळाने बंजारा भजनातून ग्रामस्थांचे प्रबोधन केले. महिलांनी पारंपारिक वेशभूषा परिधान करून पारंपारिक लेंगी नृत्य सादर करत उपस्थितांचे लक्ष वेधले.सायंकाळी सेवालाल महाराज यांची विधिवत आरती व पूजन करण्यात आले.यावेळी सर्व भाविकांनी आयोजीत भोग भंडाऱ्याचा आस्वाद घेतला.रात्री विविध स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात आले.यावेळी माणिकदौंडी येथील वैद्यकीय अधिकारी डॉ कल्याण जाधव हे उपस्थित होते.  

सेवालाल महाराजांच्या जयंती निमित्त परिसरातील विद्यार्थ्या मधून कलागुण वाढीस लागून संस्कृतीची जपवणूक करण्यासाठी पारंपारिक नृत्य व वेशभूषा स्पर्धा अश्या उपक्रमांना या माध्यमातून प्रोत्साहन दिले जात आहे असे अभियंता अतुल राठोड यांनी सांगितले.यावेळी लहान मुलींनी पारंपारिक वेशभूषेत पारंपारिक बहारदार गीते व नृत्य सादरीकरण करत उपस्थितांचे लक्ष वेधले.सेवालाल महाराज जयंती उत्सव यशस्वी करण्यासाठी घुमटवाडी ग्रामस्थ,आजी-माजी ग्रामपंचायत सदस्य,सरपंच व गावातील तरुणांनी परिश्रम घेतले.

COMMENTS