Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

भोंदू खरातसह संबंधित नेत्यांवर कारवाई व्हावी : डॉ अजित नवले

https://youtu.be/z_zQF_S4HHc?si=c_bQJSJJUvADPro7 अशोक खरात या भोंदू बाबाने नाशिक येथे राज्यभरातील हजारो लोकांची आर्थिक व शारीरिक लूट केली आह

विधानभवनासमोर तरुणाचा आत्मदहनाचा प्रयत्न; पोलिसांच्या तत्परतेने अनर्थ टळला
युद्धामुळे जागतिक अर्थव्यवस्थेला मोठा धक्का : पंतप्रधान मोदी; दूरगामी परिणाम होण्याची चिन्हे, देशाच्या ऊर्जा सुरक्षेला प्राधान्य
अवकाळीग्रस्तांना तातडीची मदत द्या : वडेट्टीवारांची मागणी

अशोक खरात या भोंदू बाबाने नाशिक येथे राज्यभरातील हजारो लोकांची आर्थिक व शारीरिक लूट केली आहे, मानसिक छळ केला आहे. या संपूर्ण प्रकरणाची व्याप्ती पाहता त्यात अनेक मोठे प्रभावशाली राजकीय नेते गुंतलेले दिसते आहे. अशा पार्श्वभूमीवर या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून यातील सर्व दोषींना कठोरातील कठोर शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष करत आहे.

कुणीही भोंदू बाबा एकट्याने इतक्या मोठ्या प्रमाणात लोकांची फसवणूक करू शकत नाही. त्यामागे राज्यातील सत्ताधारी, राजकीय नेते, आणि प्रशासनातील काही घटक यांचा हात असण्याची दाट शक्यता आहे. अशा परिस्थितीत सत्य समोर यावे यासाठी, या प्रकरणाची उच्चस्तरीय, स्वतंत्र व कालबद्ध चौकशी (SIT किंवा न्यायालयीन देखरेखीखाली) करण्यात यावी. अशोक खरात यांच्याशी संबंधित सर्व मालमत्ता सरकारने ताब्यात घ्यावी.

COMMENTS