Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अहिल्यानगर एमआयडीसी परिसरात लग्नकार्यासाठी नेलेले लाखो रुपयांचे दागिने हडप

अहिल्यानगर : लग्नकार्यात घालण्यासाठी विश्वासाने नेलेले ४ लाख ९० हजार रुपये किमतीचे सुमारे साडेतीन तोळ्यांचे सोन्याचे दागिने परत न करता, त्याचा अप

वृद्धांसाठी घरपोच ‘हयाती’ची नोंदणी; कर्जतमधील नगरसेविका नीता कचरे यांचा अनोखा उपक्रम
पाण्याच्या वादातून कुऱ्हाडीने हल्ला; लोहगाव शिवारातील घटनेप्रकरणी दोघांवर सोनईत गुन्हा दाखल
कर्जतमध्ये हॉटेलमधील आचाऱ्याचा निर्घृण खून; उत्तर प्रदेशातील तीन आरोपींना दौंड रेल्वेस्थानकावरून घेतले ताब्यात
नगर: निंबळक येयील रेल्वे अपघातात महिलेचा मृत्यूर;पोलिसात गुन्हा

अहिल्यानगर : लग्नकार्यात घालण्यासाठी विश्वासाने नेलेले ४ लाख ९० हजार रुपये किमतीचे सुमारे साडेतीन तोळ्यांचे सोन्याचे दागिने परत न करता, त्याचा अपहार केल्याचा प्रकार नागापूर परिसरातील पितळे कॉलनी येथे उघडकीस आला आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात एका महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वनिता परसराम नवले (वय ३३, रा. पितळे कॉलनी, नागापूर) यांनी रविवारी (२४ मे) याप्रकरणी फिर्याद दिली आहे. अनिता गणेश नजन (हल्ली रा. गणेश पार्क, गणेश चौक, अहिल्यानगर) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपी महिलेचे नाव आहे. फिर्यादी वनिता नवले यांचा त्यांच्या घराशेजारी पूर्वी राहणाऱ्या अनिता नजन या ओळखीच्या महिलेवर पूर्ण विश्वास होता. तिने लग्नकार्यात घालण्यासाठी दागिने हवे असल्याचे सांगून दोन तोळे वजनाची सोन्याची पोत, १० ग्रॅम वजनाचे सोन्याचे कानातले फुल आणि वेल, तसेच ५ ग्रॅम वजनाची सोन्याची ठुसी असे दागिने नेले होते.

हे दागिने घेतल्यानंतर अनिता नजन हिने ते परत न करता सोन्याचा अपहार केला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पीडित महिलेने एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद नोंदवली. ही घटना १५ ते २२ मे दरम्यान घडली असून पोलीस अंमलदार गणेश चौधरी या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.

COMMENTS