Homeताज्या बातम्यासंपादकीय

गुजरातेत सत्ता विक्रमाच्या बरोबरीची संधी ! 

गुजरात राज्यातील निवडणूकांना आरंभ होऊन काल प्रत्यक्ष मतदानही झाले. परंतु, या मतदानाचे वैशिष्ट्ये असे की, २०१७ च्या निवडणूकीच्या तुलनेत पहिल्या टप

अमेरिकन न्यायालयातील असामाजिकता ! 
तामिळनाडू प्रपोगंडामागचे खलत्त्व ! 
ब्राह्मणेतर चळवळीची शकले : ओबीसी-मराठा संघर्ष! 

गुजरात राज्यातील निवडणूकांना आरंभ होऊन काल प्रत्यक्ष मतदानही झाले. परंतु, या मतदानाचे वैशिष्ट्ये असे की, २०१७ च्या निवडणूकीच्या तुलनेत पहिल्या टप्प्यातील मतदान जवळपास पाच टक्क्यांनी कमी झाले आहे. मात्र, काल पार पडलेल्या मतदानाचे वैशिष्ट्ये असे की, सर्वाधिक मतदान आदिवासी बहुल मतदार संघात झाले आहे. आदिवासी मतदार संघात ७७ टक्के मतदान झाल्याची नोंद निवडणूक आयोगाने केली आहे; तर बोताड जिल्ह्यात सर्वात कमी म्हणजे ५७ टक्के मतदान झाले. अर्थात, एकूण मतदानाची सरासरी ६० टक्के अशी म्हणता येईल. पारंपारिक मान्यता अशी आहे की, जेव्हा, मतदानाची टक्केवारी कमी असते, तेव्हा, त्याचा फायदा सत्ताधारी पक्षालाच मिळतो. जर गुजरात मध्ये या मतदानाचा फायदा सत्ताधारी भाजपला होऊन ते पुन्हा सत्तेवर आले तर पश्चिम बंगालच्या कम्युनिस्ट पक्षानंतर सलग सातवेळा सत्तेत येण्याची बरोबरी भाजप करू शकते.

गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात ६३ टक्के मतदान झाले. गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात एकोणीस जिल्ह्यांतील ८९ जागांसाठी ६३ टक्के मतदान झाले. सौराष्ट्र-कच्छ आणि राज्याच्या दक्षिण भागात, आणि आदिवासी बहुल भागात हे मतदान झाले असे, निवडणूक आयोगाने सांगितले. २०१७ च्या विधानसभा निवडणुकीत, पहिल्या टप्प्यात त्याच ८९ मतदारसंघांमध्ये मतदानाची टक्केवारी ६७ टक्के होती.  नवसारी येथे ७१.०६ टक्के मतदान झाले तर बोताड जिल्ह्यात सर्वात कमी ५७ टक्के मतदान झाल्याची नोंद अंतिम आकडेवारीत करण्यात आली आहे. त्यानंतर अमरेली येथे ५७.५९ टक्के मतदान झाले. दहा जिल्ह्यांमध्ये ६० टक्क्यांहून अधिक मतदान झाले, तर इतर सहा जिल्ह्यांमध्ये ६० टक्क्यांहून कमी मतदान झाले.  दुसऱ्या टप्प्यातील ८३३ उमेदवारांसह ५ डिसेंबरला मतदान होणार असून ८ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. २०१७ च्या निवडणुकीत या ८९ जागांपैकी भारतीय जनता पक्षाने (भाजप) ४८, काँग्रेसने ४० जागा जिंकल्या होत्या. तर एक जागा अपक्ष उमेदवाराला मिळाली होती. राज्यात २७ वर्षे सत्ता गाजवणारा भाजप सलग सातव्यांदा सत्तेवर राहण्यासाठी प्रयत्नशील आहे. जर ते यशस्वी झाले तर ते सलग सात वेळा पश्चिम बंगालच्या निवडणुका जिंकलेल्या डाव्या आघाडीच्या सरकारच्या विक्रमाची बरोबरी करतील. त्याचवेळी, पक्षाला केवळ पारंपरिक प्रतिस्पर्धी काँग्रेसकडूनच नव्हे, तर आम आदमी पक्षाच्या स्पर्धेलाही सामोरे जावे लागते आहे. पण आम आदमी पार्टी (आप), स्वतःला सत्तेचा मुख्य दावेदार म्हणून सांगत आहेत आणि एक जागा सोडून सर्व जागा लढवत आहेत. भाजप, काँग्रेस आणि आप व्यतिरिक्त, बहुजन समाज पक्ष, समाजवादी पार्टी यासह इतर ३६ राजकीय संघटना देखील या निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. जामनगरमधील ध्राफा येथे स्त्री-पुरूष मतदारांची वेगळी रांग न केल्याने, नर्मदामधील सामोत यात आदिवासींच्या जमिनी नावावर न केल्याच्या निषेधार्थ आणि भरूच जिल्ह्यातील केसरमध्ये निवडणूक शिस्तीच्या अभावाचे कारण सांगत मतदारांनी बहिष्कार घातला. गुजरात निवडणुकीचा निकाल काय लागेल हे निश्चित सांगता येणार नसले तरी भाजप एका विक्रमाच्या बरोबरीला येऊन ठेपल्याने, ही संधी संघ परिवार वाया जाऊ देणार नाही, असे काही जाणकारांचे मत आहे. सध्या ज्या ८९ जागांसाठी मतदान झाले, त्यात गेल्या २०१७ च्या निवडणुकीत भाजप आणि काँग्रेस बरोबरीत होते. यावेळी, आम आदमी पक्षाने धडक दिल्यामुळे नुकसान काॅंग्रेसला झाले तर फायदा आप ऐवजी भापलाच होईल, असाही मतप्रवाह आहे. बघूया, ८ डिसेंबर रोजी काय घडते ते!

COMMENTS