Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नसरापूर घटनेतील पीडित मुलीचा मृत्यू ‘ॲस्फिस्किया’मुळे झाल्याचे स्पष्ट; पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून धक्कादायक खुलासा

भोर : पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथील साडेतीन वर्षांच्या चिमुरडीवर झालेल्या अत्याचार आणि हत्या प्रकरणात आता एक मोठी अपडेट समोर आली आहे. या पीडितेच

जळगाव मध्ये ब्लॅकमेलिंगच्या जाळ्यात अनेक तरुणी? आरोपी यश जैनच्या मोबाईलमध्ये सापडला आक्षेपार्ह व्हिडिओंचा साठा! जळगाव पोलिसांकडून नराधमाला बेड्या!
शुभ्रा रंजनचे अपहरण करत उकळली खंडणी; तब्बल 1 कोटी 89 लाखाची उकळली खंडणी; आरोपी निघाला विद्यार्थीच
संगमनेरमध्ये भोंदूगिरीचा ‘दत्तधाम’ पॅटर्न फसला! वडगावपान येथे पोलिसांची मोठी कारवाई
Pune Nasrapur Case | सर्वात मोठी अपडेट! अत्याचारानंतर मुलीचा मृत्यू  ऑस्फक्सियामुळे, मेंदूसह इतर...

भोर : पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथील साडेतीन वर्षांच्या चिमुरडीवर झालेल्या अत्याचार आणि हत्या प्रकरणात आता एक मोठी अपडेट समोर आली आहे. या पीडितेचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? याचा खुलासा ससून रुग्णालयाने दिलेल्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये झाला आहे.
ससून रुग्णालयाने पोलिसांकडे सोपवलेल्या शवविच्छेदन अहवालानुसार, चिमुरडीचा मृत्यू ‘ॲस्फिस्किया’ (Asphyxia) म्हणजेच श्वास कोंडल्यामुळे झाला आहे. शरीरातील ऑक्सिजनचा पुरवठा अचानक थांबल्याने या साडेतीन वर्षांच्या बालिकेची प्राणज्योत मालवली. या अहवालामुळे आरोपीने केलेले कृत्य किती निर्घृण होते, हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.
दुसरीकडे, या खटल्यासाठी राज्य सरकारकडून विशेष सरकारी वकिलांची नियुक्ती करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. पुणे ग्रामीण पोलिसांनी तीन नावांची शिफारस केली असून, प्रख्यात वकील ॲडव्होकेट अजय मिसर यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची दाट शक्यता आहे. आज संध्याकाळपर्यंत या नियुक्तीची अधिकृत घोषणा होऊ शकते.
या प्रकरणावरून राजकीय वातावरणही तापले आहे. आरोपी भीमराव कांबळे हा सराईत गुन्हेगार असतानाही पोलिसांनी ही माहिती न्यायालयात का दिली नाही? असा सवाल करत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी गृहविभागावर टीका केली आहे. या घटनेची चौकशी महिला IPS अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखालील ‘SIT’ द्वारे करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
सध्या आरोपी ७ मे पर्यंत पोलीस कोठडीत आहे. पुणे ग्रामीण पोलिसांनी सहा अधिकाऱ्यांचे विशेष पथक तयार करून तपास वेगाने सुरू केला आहे. १ मे रोजी घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट असून, आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी होत आहे.
चिमुरडीला न्याय देण्यासाठी प्रशासन आणि पोलीस आता ताकदीने कामाला लागले आहेत. मात्र, अशा नराधमांना जरब बसेल अशी कठोर कारवाई कधी होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

COMMENTS