Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

खटाव तालुक्यातील येळीव तलावात माती माफियांचा रात्रं-दिवस धुडगूस

येळीव : तलावात दिवसा जसीबीच्या सहाय्याने सुरु असलेला उपसा. येळीव : तलावात रात्रीच्या वेळी सुरु असलेला माती उपसा. येळीव : डंपरच्या सहाय्याने

हनुमान चालीसासह भोंग्यांची भाषेमुळे समाजात तेढ निर्माण : ना. जयंत पाटील
कराडचा सिध्दांत सिंहासने अभियांत्रिकी प्रवेश परीक्षेत देशात 17 वा
मंगळवारी ना. शंभूराज देसाई यांचा जनता दरबार

महसूल विभागाचे दुर्लक्ष : गाड्या भरण्यावरून वादवादी : स्थानिकांच्या तक्रारी
वडूज / आकाश यादव : खटाव तालुक्यातील येळीव याठिकाणी तलाव्यात माती माफियांचा अक्षरशः धुडगूस सुरु आहे. मोठ्या प्रमाणात अवैध माती उपसा करून वाहतूक केली जात असल्याचे चित्र आहे. तर विशेषतः महसूल विभागाच्या अधिकार्‍यांकडून दुर्लक्ष होत असल्यामुळेच या ठिकाणी बेसुमार अवैध माती उपसा सुरु असल्याचा आरोप होत आहे. तर गाड्या भरण्यावरून याठिकाणी रोज वादवादी होत असल्याच्या तक्रारी स्थानिक शेतकरी करत आहेत.
खटाव तालुक्यातील येरळा नदी पात्रात वाळू माफियांनी केलेल्या वाळू उपस्यामुळे नदी पात्रात मोठ मोठे खड्डे पडले आहेत. काही वर्षांपूर्वीच या नदी पात्रात अंबवडे येथील तीन निष्पाप बालकांना जीवाला मुकावे लागले होते. या घडलेल्या घटनेमुळे जिल्ह्यातून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला होता. यावेळी तत्कालीन संबंधित महसूल अधिकारी व काही कर्मचार्‍यांवर खातेयंतर्गत कारवाई झाली होती.
तरी ही आज खटाव तालुक्यातील अंबावडे या ठिकाणी नदी पात्रात चोरट्या पद्धतीने रात्रीच्या सुमारास अवैध वाळू उपसा सुरू आहे. आज ही याठिकाणी वाळूचे साठे केले जात असून त्याची वाहतूक खटाव सह इतर तालुक्यात केली जात आहे. विशेषतः त्याठिकाणी असणार्‍या ’अक्षयरूपी’ अण्णाची कृपादृष्टी ही जास्त आहे. मात्र, आता त्यांची उचलबांगडी केल्याची सूत्रांची माहिती आहे. याठिकाणी आता नव्या तलाट्यांची नेमणूक केली असल्याचे समजते.
तालुक्यात काही ठिकाणी वाळू उपसा होत असला तरी आता वाळू माफियांनी आपला मोर्चा माती उपस्याकडे वळवला आहे. शेतकरी वर्गाला पुढे करत काही ठग मोठ्या प्रमाणात माती उपसा करून शेतकर्‍यांना आर्थिक दृुष्ट्या लुबाडत आहेत. दिवसा अन् रात्री बेसुमार माती वाहतूक सुरु असल्याने आजूबाजूच्या शेतकर्‍यांना या माफियांचा नाहक त्रास सहन करावा लागतोय.
ज्या प्रमाणे वाळू माफियांकडून अनेक दुर्घटना घडल्या आता याचे माफियांकडून अशा दुर्घटना होण्याअगोदर महसूल विभागाने वेळीच त्यांच्या मुसक्या आवळणे गरजेचे असल्याच्या प्रतिक्रिया सामान्य जनतेतून व्यक्त होत आहेत. नव्याने रुजू झालेले तहसीलदार आता गंभीर विषयाकडे लक्ष घालणार का? असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे.

पोलिसांच्या कारवाया मात्र महसूल ढिम्म
खटाव माण तालुक्यात वाळू व अवैद्य गौण खनिजावर पोलीस विभागाने मोठ्या कारवाया करून माफियांच्या मुस्क्या आवळल्या आहेत. तत्कालीन अप्पर पोलीस अधीक्षक व सध्याचे पोलीस अधीक्षक समीर शेख, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रेरणा कट्टे, पोलीस निरीक्षक मालोजीराव देशमुख अशा डॅशिंग अधिकारी वाळू माफियांचे कर्दनकाळ ठरले होते. मात्र महसूल कडून अद्याप ही बघ्याचीच भूमिका असल्याचा आरोप सामान्य जनता करीत आहे.

महसूल अजून किती जणांचा बळी घेणार
अवैद्य गौण वाहतूक करणार्‍या वाहनावर महसूल विभागने वेळीच लक्ष न दिल्याने खटाव तालुक्यात अनेक घटना घडल्या अन् अनेक जणांना निष्पाप बळी पडावे लागले. आता सध्या अशीच अवस्था आहे. वाहनाच्या वेळेचा वेगेचा विचार केला तर सुसाट असतात. महसूल विभागाने आता अजून बळी घेणार असेल तर आमहाला त्यांना आमच्या पध्दतीने जाग आणावी लागेल.

विजयदादा शिंदे (समाजिक कार्यकर्ते)

COMMENTS