Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

चारित्र्याच्या संशयावरुन पत्नीचा निर्घृण खून करणाऱ्या आरोपी पतीस जन्मठेपेची शिक्षा

यवतमाळ प्रतिनिधी - पुसद तालुक्यातील  बोरी (खुर्द ) येथील आरोपी अंसार खान दिवानखान पठाण याने त्याच्या राहत्या घरी त्याची पत्नी हिचे चारित्र

सोमैयाच्या अक्षय आव्हाडची ‘शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासाठी’ निवड
रेल्वेच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू
सत्ताधारी जातवर्ग आरोपांच्य छायेत !

यवतमाळ प्रतिनिधी – पुसद तालुक्यातील  बोरी (खुर्द ) येथील आरोपी अंसार खान दिवानखान पठाण याने त्याच्या राहत्या घरी त्याची पत्नी हिचे चारित्र्यावर संशय घेवुन तिची निर्घृण खून करणा-या आरोपी पतीस वि. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश क. २ पुसद श्रीमती. एन. एच. मखरे मॅडम यांचे न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. उमरखेड येथील सय्यद अहमद सय्यद मुसा रा. काझीपुरा वार्ड येथील रहिवासी असलेले फिर्यादी यांची मुलगी शाहिस्ता परविन हिचा विवाह बोरी (खुर्द) ता. पुसद येथे आरोपी अंसार खान दिवानखान पठाण याच्या सोबत उमरखेड येथे विवाह झाला होता. पती आरोपी अंसारने त्याच्या पत्नीला माहेर उमरखेड येथुन त्याच्या घरी बोरी खुर्द येथे घेवून आला. व त्याच रात्री त्याने पत्नीचे चारित्र्यावर संशय घेवुन पत्नीची हत्या केली. सदर प्रकरणात आरोपी विरुध्द खुनाचा गुन्हा सिध्द झाल्याने वि. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश क.२, पुसद श्रीमती. एन. एच. मखरे मॅडम यांचे न्यायालयाने आरोपीस भा.द. वि. चे कलम ३०२ अन्वये जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. सदर प्रकरणात अतिरिक्त सरकारी अभियोक्ता अँड. मनोज कृष्णराव काळेश्वरकर तर कोर्ट पैरवी म्हणून श्री. अश्पाक ईमाम नवरंगाबादे यांनी कामकाज पाहिले.

COMMENTS