Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शिराळा शहरालगत चार महाकाय गव्यांचे दर्शन

बिबट्या बरोबरीने आता गव्याचे दिवसा व रात्रीही दर्शन होत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.शिराळा / प्रतिनिधी : शिराळा श

माण तालुक्यात अवैध वाळू उपसा; 17 लाख 45 हजाराचा मुद्देमाल जप्त
ऊस वाहतुकीसाठी सीएनजी वापरावर भर देणार : डॉ. सुरेश भोसले
गाय खरेदीसाठी दूध उत्पादकांचे पंजाब-हरियाणाला प्राधान्य

बिबट्या बरोबरीने आता गव्याचे दिवसा व रात्रीही दर्शन होत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
शिराळा / प्रतिनिधी : शिराळा शहरा लगत असणार्‍या गोरक्षनाथ मंदिर, कापरी, जांभळेवाडी दरम्यान आज सकाळच्या सुमारास चार गव्यांचा वावर आढळून आला. याच परिसरात बिबट्याचाही वावर आहे. काही महिन्यांपूर्वी दुचाकीवरील नागरिकावर बिबट्याने हल्ला केला होता. दरम्यान, बिऊर, भाटशिरगाव, पावलेवाडी आदी परिसरात 8 गव्यांचा कळप आढळून आला. मानवी वस्तीत वाढत असलेल्या बिबट्या व गव्यांच्या वावरामुळे नागरिक व शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे.
शिराळा शहरासह तालुक्यात बिबट्या पाठोपाठ आता गव्याचे दिवसा व रात्रीही दर्शन होत आहे. त्यामुळे बाहेर कोरोना अन् शेतात गव्याची भीती अशी अवस्था झाल्याने शेतांच्या कामात व्यत्यय येत आहे. चांदोली राष्ट्रीय उद्यानामध्ये प्राण्यांना खाद्य मिळत नसलेने त्यांचा मानवीवस्तीत वावर वाढला आहे.
बिबटे, माकडे, वानरे यांचा वावर हा नित्याचाच आहे. त्यात आता गव्यांची भर पडली आहे. शिराळा शहरासह तालुक्यात अनेक गावांत महिन्यातून एक वेळ तरी कोणत्या ना कोणत्या गावात पाळीव प्राण्यांवर बिबट्याचा हल्ला झालेला असतो. माकडे व वानरे पिकांचे नुकसान करत आहेत. काही महिन्यांपूर्वी मणदूर येथील संतू पाटील यांना गव्याने जखमी केले होते. देववाडी, खेड फाटा, शिराळा बसस्थानक, चिखलवाडी, पवारवाडी, शिंगटेवाडी परिसरात दि. 29 व 30 एप्रिल 2020 रोजी रात्री गव्याचे दर्शन झाले होते. हा गवा डांगे गल्ली, पवळ गल्लीतून जात याठिकाणी मक्याच्या पिकाचे नुकसान केले होते. वनक्षेत्रपाल सचिन जाधव यांचे मार्गदर्शनाखाली चंद्रकांत देशमुख, देवकी तहसिलदार, हणमंत पाटील, संपत देसाई, बाबा गायकवाड, नामदेव सिद, संभाजी पाटील यांनी या परिसराची पाहणी केली.

COMMENTS