गृहविभाग येणार अ‍ॅक्शन मोडमध्ये ?

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

गृहविभाग येणार अ‍ॅक्शन मोडमध्ये ?

दिलीप वळसे पाटील यांनी घेतली मुख्यमंत्री ठाकरे यांची भेटमुंबई/प्रतिनिधी : राज्यात तपास यंत्रणांचे छापे सुरू असतांना, गृह विभाग मात्र आपली ठोस भूमिका

कितीही वादळे येऊ द्या, लातूरचा देशमुख वाडा तिथेच
सिन्नर बाजार समितीत आमदार कोकाटेंना झटका 
फडणवीसांच्या मर्जीतील बिल्डरची कार जप्त ; हिरेन हत्या प्रकरणात नवा ट्वीस्ट

दिलीप वळसे पाटील यांनी घेतली मुख्यमंत्री ठाकरे यांची भेट
मुंबई/प्रतिनिधी : राज्यात तपास यंत्रणांचे छापे सुरू असतांना, गृह विभाग मात्र आपली ठोस भूमिका घेत नसल्याची नाराजी शिवसेना वर्तूळातून व्यक्त करण्यात येत आहे. भाजप नेत्यांच्या अनेक प्रकरणे असतांना गृहविभाग मात्र कारवाई करण्यास भूमिका घेत नसल्याची तक्रार केल्यानंतर, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि मुंबई पोलिस आयुक्त संजय पांडे यांची बैठक झाली. त्यानंतर गृहमंत्री वळसे पाटील यांनी शुक्रवारी मुख्यमंत्री ठाकरे यांची भेट घेतली. त्यानंतर राज्याचे पोलिस महासंचालक रजनीश सेठ हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीला गेले आहेत. त्यामुळे गृहविभाग आता तरी अ‍ॅक्शन मोडमध्ये येणार का, असा सवाल विचारला जात आहे. ठाकरे यांनी शरद पवारांकडे राष्ट्रवादी पक्ष भाजपविरोधात मवाळ भूमिका घेत असल्याची नाराजी जाहीर केल्यानंतर नेत्यांमध्ये भेटीगाठी सुरु आहेत. शिवसेनेचा मूळ आक्षेप गृहखात्यावर असल्याचे बोलले जात होते. त्यातच आता शिवसेना गृहमंत्रपदासाठी आग्रही असल्याची चर्चा आहे. दरम्यान गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना यावर प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्री नाराज असल्याची चर्चा सुरु असतानाच दिलीप वळसे पाटील उद्धव ठाकरेंना भेटण्यासाठी पोहोचले होते. या भेटीनंतर उद्धव ठाकरे यांनी आपण नाराज नसल्याचे स्पष्ट केले.
गेल्या काही दिवसांपासून भाजप आणि महाविकास आघाडी सरकारमधील संघर्ष पराकोटीला जाऊन पोहोचला आहे. भाजप नेत्यांनी तक्रारी केल्यानंतर काही दिवसांमध्येच ईडीकडून धाडी सुरु असल्याने महाविकास आघाडी सरकारमधील अनेक मंत्री संतप्त भावना व्यक्त करत आहेत. तुलनेत राष्ट्रवादीच्या ताब्यात असलेल्या गृह खात्याकडून भाजप नेत्यांच्या बाबतीत घेतलेल्या मवाळ भूमिकेवरून शिवसेनेनं जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर माध्यमांना संबोधित करतांना वळसे पाटील म्हणाले की, सध्या देशात वातावरण तापविण्याचा प्रयत्न सुरू आहे. देशात महागाईचे संकट सुरू आहे. शरद पवार यांनी केलेले वक्तव्य योग्यच आहे. भाजपकडून जी आश्‍वासने दिली गेली होती, ते आश्‍वासन त्यांना पूर्ण करता आलेली नाहीत. त्यामुळे समाजात सध्या भाजपकडून अशांतता पसरविण्याचे काम केले जात आहे. अपयश लपविण्यासाठी भाजप अशी कारस्थानं करत आहे, अशीही टीका वळसे पाटील यांनी केली आहे.
दिलीप वळसे पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यानंतर गृहखात्यावरून सुरू असलेल्या धुसफूशीवर मुख्यमंत्र्यांनी खुलासा केला आहे. गृहमंत्र्यांवर मुख्यमंत्री नाराज अशा बातम्या काही माध्यमांवर येत आहेत. या बातम्यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खंडन केले आहे. अशा बातम्या चुकीच्या आणि विपर्यास्त करणार्‍या असून माझा माझ्या सहकार्‍यांवर पूर्ण विश्‍वास आहे, आणि ते उत्तम काम करीत आहेत, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे.

मुख्यमंत्री ठाकरे यांनी केली गृहविभागाची पाठराखण
भाजप नेत्यांवर पुरावे देऊनही गृहखात्याकडून कारवाई होत नसल्याच्या पार्श्‍वभूमीवर दोन्ही नेत्यांवर चर्चा झाल्याचे सूत्रांनी सांगितले. तर, राऊत यांनी गृहमंत्रालयाला सक्षम बनण्याचा सल्ला दिला असला तरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मात्र, या भेटीनंतर दिलीप वळसे पाटील उत्तम काम करत असल्याचे म्हटले आहे. मुख्यमंत्र्यांनी दिलीप वळसे पाटील यांची पाठराखण केल्याने अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. येणार्‍या काळात भाजप नेत्यांवर कारवाई करण्याबाबत या दोन्ही नेत्यांमध्ये एकमत झाले का अशी चर्चाही या निमित्ताने रंगली आहे.

COMMENTS