Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शाळांच्या व्यापारीकरणाला लगाम; सक्तीच्या खरेदीवर शिक्षण विभागाचा कडक इशारा; गणवेश, पुस्तके, साहित्य विशिष्ट दुकानातून घेण्यास भाग पाडल्यास कारवाई अटळ

नांदेड : जिल्ह्यातील काही शाळांकडून पालकांवर गणवेश, वह्या, पुस्तके व शैक्षणिक साहित्य विशिष्ट दुकानातूनच खरेदी करण्यासाठी दबाव टाकला जात असल्याच्

शिक्षकांच्या बदल्यांना यंदा ‘ब्रेक’! जनगणनेच्या कामामुळे राज्य सरकारचा मोठा निर्णय
सगरोळी मार्गावरील विस्कळीत बससेवा पूर्ववत सुरू करण्याची मागणीबिलोली-देगलूर व नांदेड-सगरोळी बसफेर्‍या तातडीने सुरू करण्यासाठी नागरिकांचे निवेदन
महाराष्ट्र दिनानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, हनुमान नगर येथे उत्साहात ध्वजारोहण
release of reservation for nanded zilla parishad group and panchayat samiti  ganas announced | Nanded Jilha Parishad Reservation : नांदेड जिल्ह्यातील  जिल्हा परिषद गटाच्या आरक्षणाची सोडत जाहीर, पहा ...

नांदेड : जिल्ह्यातील काही शाळांकडून पालकांवर गणवेश, वह्या, पुस्तके व शैक्षणिक साहित्य विशिष्ट दुकानातूनच खरेदी करण्यासाठी दबाव टाकला जात असल्याच्या तक्रारी गंभीरतेने घेत शिक्षण विभागाने कठोर भूमिका जाहीर केली आहे. शाळांनी पालकांच्या निवडीच्या अधिकारावर गदा आणू नये, अन्यथा संबंधित संस्थांवर प्रशासकीय तसेच कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे.
अलीकडील काळात काही खासगी शाळांनी ठराविक विक्रेत्यांशी संगनमत करून विद्यार्थ्यांच्या पालकांना आर्थिक कोंडीत पकडल्याच्या तक्रारी समोर आल्या होत्या. शाळेचा लोगो असलेला गणवेश, विशिष्ट प्रकारच्या वह्या, महागडे साहित्य किंवा ठराविक प्रकाशकांची पुस्तके केवळ एका दुकानातूनच उपलब्ध असल्याचे सांगत पालकांना पर्यायच उरू दिला जात नव्हता. परिणामी अनेक कुटुंबांवर अनावश्यक आर्थिक भार पडत होता. या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे की, कोणत्याही शाळेला पालकांना विशिष्ट दुकानातून खरेदी करण्यास भाग पाडण्याचा अधिकार नाही. शैक्षणिक संस्था या शिक्षणासाठी आहेत, व्यापारासाठी नव्हेत. शाळांनी शिस्तीच्या नावाखाली व्यापारी व्यवहार चालविल्यास त्याची गंभीर दखल घेतली जाईल. पालकांना अशा प्रकारच्या सक्तीचा सामना करावा लागत असल्यास त्यांनी गटशिक्षणाधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी किंवा संबंधित प्रशासकीय कार्यालयाकडे तक्रार नोंदवावी, असे आवाहनही करण्यात आले आहे. प्राप्त तक्रारींची तातडीने चौकशी करून दोषी आढळणार्‍या संस्थांवर आवश्यक ती कारवाई केली जाणार असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, पाठ्यपुस्तकांच्या बाबतीतही विभागाने नियमांची आठवण करून दिली आहे. राज्य मंडळाशी संलग्न शाळांनी अधिकृत बालभारती पुस्तकेच वापरणे बंधनकारक आहे. तसेच इतर मंडळांच्या शाळांनी मान्यताप्राप्त अभ्यासक्रमाबाहेरील महागडी खाजगी पुस्तके सक्तीने विकत घेण्यास भाग पाडू नये, असे निर्देश देण्यात आले आहेत. शिक्षण क्षेत्रात वाढत चाललेल्या व्यापारी प्रवृत्तीवर अंकुश ठेवण्यासाठी प्रशासनाने उचललेले हे पाऊल पालकांसाठी दिलासादायक मानले जात आहे. नियमांचे पालन करणार्‍या शाळांना याचा त्रास होणार नसला, तरी शिक्षणाच्या नावाखाली कमाईचे केंद्र उभारणार्‍यांसाठी हा स्पष्ट इशारा ठरणार आहे.

COMMENTS