Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पाळण्याच्या टेंडरवरून नगरसेवकाच्या भावाला जीवे मारण्याची धमकी

राहाता : वीरभद्र महाराज यात्रेतील पाळण्याच्या टेंडरवरून राहाता शहरात वाद निर्माण झाला असून नगरसेवकाच्या भावाला पिस्टल दाखवत जीवे मारण्याची धमकी द

आ. काळेंकडून अवैध वाळू उपशाचा प्रश्न विधिमंडळात
विकास कामात गुणवत्तेबाबत तडजोड नाही : संधान; कर्मवीरनगरमधील अंतर्गत रस्त्यांच्या कामांना गती; नगराध्यक्षांकडून पाहणी
वारी येथे ‘महिला शक्ती’च्या हस्ते पाणपोईचे लोकार्पण

राहाता : वीरभद्र महाराज यात्रेतील पाळण्याच्या टेंडरवरून राहाता शहरात वाद निर्माण झाला असून नगरसेवकाच्या भावाला पिस्टल दाखवत जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी राहाता पोलिस ठाण्यात तुषार गणेश सदाफळ, योगेश ससाणे व इतर ८ ते १० अनोळखी इसमांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत पांडुरंग अशोक तुपे (वय ४७, रा. राहाता) यांनी राहाता पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. 

फिर्यादीनुसार, गुरुवारी (दि. ५) रात्री सुमारे ९.४२ वाजता तुषार सदाफळ याने फोन करून विरभद्र महाराज यात्रेतील पाळण्याचे टेंडर इतरांना देणार का, असा सवाल करत शिवीगाळ केली. त्यानंतर “चितळी रोडवरील छत्रपती संभाजी महाराज चौकात ये, काय ते पाहतो,” असे सांगत फोन कट केला.

यानंतर तुपे रात्री सुमारे १० वाजता संबंधित ठिकाणी गेले असता तुषार सदाफळ, योगेश ससाणे व इतर काही जण तेथे उपस्थित होते. यावेळी सदाफळ याने त्याच्याकडील परवानाधारक पिस्टल काढून दाखवत “तू आणि तुझा भाऊ राजकारण करून टेंडर तुमच्या मर्जीतील माणसाला देणार असाल तर गोळ्या घालीन,” अशी धमकी दिल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. या प्रकरणी राहाता पोलिस ठाण्यात  गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक कुमावत करत आहेत.

दरम्यान, या घटनेच्या निषेधार्थ शहरातील काही नगरसेवक व ग्रामस्थांनी शुक्रवारी सकाळी राहाता पोलिस ठाण्यात जाऊन निवेदन दिले. नगरसेवकाच्या कुटुंबीयांनाच धमक्या मिळत असतील तर सामान्य नागरिकांचे काय, असा सवाल यावेळी उपस्थित करण्यात आला.

COMMENTS