शेतकर्‍यांनी कृषी योजनांचा लाभ घ्यावा : आ.आशुतोष काळे

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शेतकर्‍यांनी कृषी योजनांचा लाभ घ्यावा : आ.आशुतोष काळे

कोपरगाव :- महाविकास आघाडी सरकार शेतकर्‍यांच्या बाबतीत अतिशय संवेदनशील आहे. शेतकर्‍यांचे शाश्‍वत उत्पन्न वाढवून शेतकर्‍यांना उर्जितावस्था प्राप्त करून

“सोलापूरच्या कुर्डुवाडी नगरपालिकेत तब्बल ४०० कोटींचा गैरव्यवहार” l पहा I LokNews24
कोतवाली पोलिस ठाण्याच्या आवारात विष घेऊन एकाचा आत्महत्येचा प्रयत्न
राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांची ईडीकडून चौकशी

कोपरगाव :- महाविकास आघाडी सरकार शेतकर्‍यांच्या बाबतीत अतिशय संवेदनशील आहे. शेतकर्‍यांचे शाश्‍वत उत्पन्न वाढवून शेतकर्‍यांना उर्जितावस्था प्राप्त करून देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. त्यासाठी अनेक शेतकरी हिताचे उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून महा-डीबीटी पोर्टलच्या माध्यमातून महाविकास आघाडी शासनाने एक अर्ज अनेक योजना हि मोहीम शेतकर्‍यांसाठी राबविली जात आहे. या मोहिमेत जास्तीत जास्त शेतकर्‍यांनी एका अर्जावर अनेक घटकांचा लाभ घेण्यासाठी अर्ज करावे. या योजनेत सहभागी होण्यासाठी शेतकर्‍यांना कृषी विभागाने प्रोत्साहित करून कृषी विभागाच्या योजनांचा शेतकर्‍यांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन आ. आशुतोष काळे यांनी केले आहे.
महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या वतीने कृषी यांत्रिकीकरण उपअभियान सन 2021-22 अंतर्गत पात्र लाभार्थी शेतकर्‍यांना अनुदानाच्या माध्यमातून ट्रॅक्टर व ट्रॅक्टरचलित अवजारे लाभार्थी शेतकर्‍यांना देण्यात आले तसेच हरभरा बियाणे, जैविक संच यांचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, चालू वर्षीचा खरीप हंगाम अडचणीचा होता. अतिवृष्टीमुळे खरीपाचे काहीसे नुकसान झाले आहे. परंतु झालेले नुकसान भरून काढण्यासाठी रब्बी हंगामात शेतकर्‍यांच्या उत्पन्नात वाढ होणे गरजेचे आहे. पाऊस समाधानकारक झाला असल्यामुळे बियाणे व खतांची देखील मागणी वाढणार आहे. अशा परिस्थितीत शेतकर्‍यांना बियाणांची व खतांची टंचाई जाणवणार नाही याची काळजी घेऊन शेतकर्‍यांच्या उत्पन्न वाढीसाठी कृषी विभागाने योग्य नियोजन करावे अशा सूचना आ.आशुतोष काळे कृषी विभागाला दिल्या. दिवाळीनिमित्त तहसील कार्यालय व परिसरात लावण्यात आलेल्या महाराष्ट्र शासन बचत गटाच्या दुकांनाना आमदार आशुतोष काळे यांनी भेट दिली. यावेळी पंचायत समिती सभापती पौर्णिमा जगधने, उपसभापती अर्जुनराव काळे, पंचायत समिती सदस्य मधुकर टेके, श्रावण आसने, अनिल कदम, रोहिदास होन, गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी, तालुका कृषी अधिकारी मनोज सोनवणे, जिनिंग प्रेसिंग सोसायटीचे चेअरमन गोरक्षनाथ जामदार, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष चारुदत्त सिनगर, नगरसेवक मंदार पहाडे, राजेंद्र वाकचौरे, गौतम बँकेचे संचालक सुनील शिलेदार, सुनील बोरा, प्रशांत वाबळे, विठ्ठल जावळे, प्रशांत घुले, आकाश डागा, अनंत रक्ताटे, गणेश घाटे, प्रकाश दुशिंग, सलीम पठाण आदींसह शेतकरी, बचत गटांच्या महिला आदी उपस्थित होते.

शेतकर्‍यांच्या अडचणी कमी कशा होतील यासाठी कृषी विभाग सतत प्रयत्नशील असून शेतकर्‍यांना घर बसल्या महाडीबीटी फार्मर पच्या माध्यमातून शेतकरी अर्ज करू शकतात. या उपक्रमात जास्तीत जास्त शेतकर्‍यांनी सहभाग नोंदवावा. आमदार आशुतोष काळे यांच्या प्रयत्नातून मागील दोन वर्षात मोठ्या प्रमाणात निधी कोपरगाव मतदार संघाला मिळाला आहे. अशा योजनेत जास्तीत जास्त शेतकर्‍यांनी सहभाग घेतल्यास खर्‍या अर्थाने शाश्‍वत रब्बी हंगामात उत्पादन वाढीसाठी हातभार लागेल व शेतकर्‍यांची आर्थिक उन्नती साध्य करता येईल.मनोज सोनवणे प्र. तालुका कृषी अधिकारी

COMMENTS