Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

छत्रपती शिवाजी महाराजांवरील वाद ‘निरर्थक’मुख्यमंत्री फडणवीस : समाजात तणाव पसरवू नका

सोलापूर : राज्यात छत्रपती शिवाजी महाराजांबाबत सुरू असलेल्या वादांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी यावर भाष्य करत असे वाद घालणे निरर्

वशेष अधिवेशन बोलावून शक्ती कायदा पारीत कराआमदार रोहित पवारांची राज्य सरकारकडे मागणी
पुण्यात पुन्हा टोळीसंघर्ष भडकलाअक्षय म्हस्केची गोळ्या झाडून हत्या
मुंबईत धर्म विचारून चाकू हल्लामीरा रोडवरील घटना, एटीएसकडून तपास सुरू


सोलापूर : राज्यात छत्रपती शिवाजी महाराजांबाबत सुरू असलेल्या वादांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी यावर भाष्य करत असे वाद घालणे निरर्थक असल्याचे म्हटले आहे. समाजात अनावश्यक तणाव निर्माण करणारे मुद्दे पुढे करून चर्चा रंगवणे चुकीचे असून, त्यातून सामाजिक सलोखा बिघडण्याची शक्यता असल्याचा इशाराही त्यांनी दिला. सोलापूर येथे पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी या प्रकरणावर स्पष्ट भूमिका मांडली.
मुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण देशासाठी प्रेरणास्थान आहेत. त्यांच्या कार्याचा आणि विचारांचा गौरव इतका मोठा आहे की, कोणत्याही प्रकारे त्यांचा अवमान करणे कोणालाही शक्य नाही. त्यामुळे त्यांच्या नावावरून वाद निर्माण करण्याचा प्रयत्न हा समाजात फूट पाडण्यासारखा आहे. इतिहासातील महान व्यक्तिमत्त्वांवरून कृत्रिम वाद उकरून काढणे, त्यावरून लोकांना भिडवणे आणि वातावरण तापवणे हे पूर्णपणे असंवेदनशील कृत्य आहे, असे ते म्हणाले. कॉम्रेड गोविंद पानसरे यांनी लिहिलेल्या ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकावरून हा वाद निर्माण झाला आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी या संपूर्ण प्रकरणात दोन्ही बाजूंवर भाष्य केले. त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, चार दशकांपूर्वी प्रकाशित झालेल्या पुस्तकावरून अचानक वाद निर्माण करणे आणि त्यावरून संघर्ष वाढवणे हे कोणत्याही दृष्टीने योग्य नाही. तसेच, आक्षेप घेणार्‍यांनी संबंधित पुस्तक वाचले आहे का, यावरही त्यांनी प्रश्‍न उपस्थित केला. ज्यांनी आक्षेप घेतले, त्यांनी पुस्तक पूर्णपणे वाचले आहे की नाही हेही स्पष्ट नाही. त्याचप्रमाणे आंदोलन करणार्‍यांनाही त्यांच्या आंदोलनाचा नेमका उद्देश समजला आहे का, असा सवाल करत मुख्यमत्र्यांनी विरोधक आणि समर्थकांना फटकारले आहे.

शांतता आणि संयमाचे आवाहन
या प्रकरणाच्या पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्रीांनी सर्व समाजघटकांना संयम राखण्याचे आवाहन केले. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा अभिमानाचा विषय असून, त्यावरून वाद न करता एकात्मता आणि प्रेरणा घेणे गरजेचे असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.राज्यात शांतता राखणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. कुठल्याही प्रकारच्या भडक वक्तव्यांपासून दूर राहून सामाजिक सलोखा जपावा, असे आवाहन त्यांनी केले.
प्रकाशक प्रशांत आंबी यांना बुलडाण्यात केले स्थानबद्ध
आमदार संजय गायकवाड यांनी केलेल्या शिवीगाळ यानंतर पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी यांनी निषेध म्हणून बुलडाण्यात सार्वजनिक वाचनाचे आयोजन केले. डाव्या विचारसरणीच्या कार्यकर्त्यांसोबत त्यांनी बुलडाण्यात मोर्चा काढला. या वेळी कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी प्रकाशक आंबी यांच्यासह काही कार्यकर्त्यांना स्थानबद्ध केल्याची माहिती समोर आली आहे.

COMMENTS