Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुंबई-गोवा महामार्गावर टोलनाक्याची तोडफोड

मुंबई : मुंबई-गोवा महामार्गावरील राजापूर तालुक्यातल्या टोलनाक्यावर तोडफोड करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गुरुवारी सायंकाळी हातिवले

दिव्यांग कल्याण अभियान दिव्यांगांच्या दारी जिल्ह्यात अद्याप अभियानाचा प्रारंभ नाहीच
भारताच्या दुसर्‍या विजयाने पाकिस्तानचे धाबे दणाणले
काँग्रेस सेवादलाच्या तालुकाध्यक्षपदी शब्बीर शेख

मुंबई : मुंबई-गोवा महामार्गावरील राजापूर तालुक्यातल्या टोलनाक्यावर तोडफोड करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गुरुवारी सायंकाळी हातिवले येथील टोलनाक्यावर ही घटना घडली आहे. या प्रकरणात पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून अन्य फरार आरोपींचा शोध घेतला जात आहे. पोलिसांकडून अटक करण्यात आलेले दोन्ही आरोपी हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते असल्याची प्राथमिक माहिती आहे. त्यानंतर आता पोलिसांकडून दोघांची चौकशी सुरू करण्यात आली आहे. आरोपींनी टोलनाक्यावरील केबिन आणि अन्य ठिकाणची मोडतोड केल्याची माहिती आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी संध्याकाळी मुंबई-गोवा महामार्गावरील राजापूर तालुक्यातल्या हातिवले येथील टोलनाक्यावर दाखल होत दहा ते पंधरा जणांच्या टोळक्याने चांगलाच धूडगूस घातला. आरोपींनी टोलनाक्यावरील केबीनची तोडफोड केली असून अन्य साहित्य आणि ऑफिस फोडले आहे. त्यानंतर या प्रकरणाची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर पोलिसांनी दोन आरोपींना ताब्यात घेतलं असून त्यांची चौकशी सुरू करण्यात आली आहे. चौकशीअंती गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे. परंतु राजापुरमध्ये घडलेल्या या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. महाराष्ट्र नवननिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पनवेलमधील मनसेच्या निर्धार मेळाव्यात मुंबई-गोवा महामार्गावरील खड्ड्यांचा प्रश्‍न उपस्थित केला होता. याशिवाय यावरून त्यांनी सत्ताधारी भाजप व शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला होता. समृद्धी महामार्गावरील अपघातांच्या घटनांवरून राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केले होेते. परंतु आता पनवेलमधील मनसेचा निर्धार मेळावा संपताच आता राजापुरात टोलनाका फोडण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. त्यामुळे आता आरोपी मनसेच्या कार्यकर्त्यांवर कठोर कायदेशीर कारवाई होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

COMMENTS