Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

त्या दोन ’भोंदू’ बाबांच्या वक्तव्याचा निषेध ः आ.रोहित पवार

जामखेड प्रतिनिधी ः सध्या देशभर चर्चेत असलेले आणि वक्तव्याने अनेकदा वादग्रस्त ठरत असलेले बागेश्‍वर महाराज आणि कालीचरण महाराजांच्या वक्तव्यावर राष्

आहिल्यादेवी होळकर जयंतीला यात्रा काढणारच : आ रोहित पवार
आमदार रोहित पवार यांची आज ईडी चौकशी
रोहित पवारांचा सुनील तटकरेंवर हल्लाबोल

जामखेड प्रतिनिधी ः सध्या देशभर चर्चेत असलेले आणि वक्तव्याने अनेकदा वादग्रस्त ठरत असलेले बागेश्‍वर महाराज आणि कालीचरण महाराजांच्या वक्तव्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आ.रोहित पवार यांनी त्यांचे थेट नाव न घेता ट्विटच्या माध्यमातून चांगलाच समाचार घेतला आहे, मात्र ट्विट मध्ये या महाराजांचे वादग्रस्त वक्तव्ये छायाचित्रासह आ.रोहित यांनी टॅग केले आहेत. तसेच या महाराजांच्या आडून भाजप राजकारण करत असल्याचा निशाणा साधला आहे.
आ.रोहित पवार यांचे ट्विट: श्री साईबाबा आणि महात्मा गांधी यांच्याबाबत दोन भोंदू बाबांनी केलेल्या वक्तव्याचा तीव्र निषेध! पण यानिमित्ताने महाराष्ट्रात होऊ घातलेल्या निवडणुका कोणत्या दिशेला नेण्यात येत आहेत, याचा अंदाज येऊ लागलाय… र्धेी र्ाीीीं पेीं श्रेीश षरळींह ळप र्हीारपळीूं. र्कीारपळीूं ळी रप ेलशरप; ळष र षशु वीेिी ेष ींहश ेलशरप रीश वळीीूं, ींहश ेलशरप वेशी पेीं लशलेाश वळीीूं. – चरहरीांर ॠरपवहळ भोंदू बाबांच्या खांद्यावर बंदूक ठेवून गांधी नष्ट करण्याचे कुणी कितीही प्रयत्न केले तरी ते नष्ट होऊ शकत नाहीत, जगात गांधी विचार अजरामर आहे. पण हे विचार संपवण्याचा एका मोठ्या राजकीय पक्षाचा प्रयत्न आहे. त्यामुळे हिम्मत असेल तर भोंदूंच्या आडून ट्रायल घेण्यापेक्षा अधिकृत भूमिका घेण्याचं धाडस त्यांनी दाखवावं! निवडणुका जवळ आल्या की तथाकथित बाबा-बुवा या भोंदू लोकांना पुढं करून वादग्रस्त विधानं करायला लावायची, जाती-जातीत, धर्मा-धर्मात वाद निर्माण करायचा आणि नॉन इश्यूवर चर्चा घडवून मुख्य प्रश्‍नांवरून लोकांचे लक्ष दुसरीकडे वळवायचे आणि आपली राजकीय भाकरी भाजायची, हे या पक्षाचं पहिल्यापासूनच धोरण राहिलेय… पण संतांच्या आणि शिव-शाहू-फुले-आंबेडकरांसारख्या महापुरुषांच्या महाराष्ट्राला हा डाव समजत नाही, या भ्रमातून या पक्षाने बाहेर यावं आणि बेरोजगारी, ढासळती अर्थव्यवस्था, बिघडलेली कायदा व सुव्यवस्था आणि बोकाळलेला भ्रष्टाचार याबाबत लोक विचारत असलेल्या प्रश्‍नांची उत्तरे भाजपने द्यावीत.

COMMENTS