Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

संजय अमोलिक यांचा अध्यापन कार्यगौरव पुरस्काराने गौरव

कोपरगाव प्रतिनिधी ः तालुक्यातील वारी येथील सोमैय्या विद्यामंदीर साकरवाडी शाळेचे आदर्श शिक्षक संजय अमोलिक यांना शिक्षण क्षेत्रातील 25 वर्षाच्या नि

संगमनेरमध्ये पुणे-नाशिक महामार्गावरील टोल कर्मचाऱ्यांचे आंदोलन
खर्डा शहरात अल्पवयीन मुलीचा विनयभंग
सकल मराठा समाजाने पुकारलेल्या पाथर्डी बंदला शहर आणि तालुक्यात शंभर टक्के प्रतिसाद

कोपरगाव प्रतिनिधी ः तालुक्यातील वारी येथील सोमैय्या विद्यामंदीर साकरवाडी शाळेचे आदर्श शिक्षक संजय अमोलिक यांना शिक्षण क्षेत्रातील 25 वर्षाच्या निरंतर बहुमोल योगदानाबद्दल ज्ञानज्योति बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने देण्यात येणारा मानाचा राज्यस्तरीय उत्कृष्ट मराठी अध्यापन सेवा कार्यगौरव पुरस्कार नुकताच मराठी ग्रामीण साहित्य संमेलनात सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला आहे.

पहिले मराठी ग्रामीण साहित्य संमेलन नुकतेच श्रीरामपूर येथे मोठ्या दिमाखात पार पडले संमेलनात 89 व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष जेष्ठ साहित्यीक श्रीपाल सबनीस, ज्येष्ठ कवी बाबासाहेब सौदागर ,पुणे विद्यापीठाचे मराठी विभाग माजीप्रमुख प्रा अविनाश सांगोलेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच श्रीरामपूरचे आमदार जेष्ठ कवी लहुजी कानडे यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. सदरचा पुरस्कार योग्य व्यक्तीला मिळाल्याने वारी पंचक्रोशीतील नागरिकांसह विद्यार्थी व पालक यांनी समाधान व्यक्त करीत अमोलिक सर यांचे अभिनंदन केले आहे त्यांचे मराठी विषयावर संशोधन ,प्रचार,प्रसार तसेच अध्यापन तर उत्कृष्ट आहेच त्याबरोबरच ते स्वतः खेळाडु असुन यापूर्वी खेळात अनेक पुरस्कार मिळविलेले आहेत त्यांचे क्रीडा क्षेत्रातील अनमोल असे कार्य आहे अनेक विद्यार्थी त्यांनी घडविले असुन सकाळी आठ ते रात्री आठ वाजेपर्यंत ते स्वतः शाळेत उपस्थित राहुन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत असतात विविध क्रिडा प्रकारात राज्यातील विविध भागात खेळत सोमैय्या शाळेच्या अनेक खेळाडूंनी नैपुण्य दाखविलेले आहे आणि पुरस्कार मिळविले आहे. या यशामुळे त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे नुकताच वारी ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार  करण्यात आला. पुरस्कार मिळाल्याबद्दल गोदावरी बायोरिफायणारीज लि साकरवाडीचे डायरेक्टर सुहास गोडगे, वारीचे प्रथम लोकनियुक्त सरपंच सतिश कानडे, माजी सरपंच बद्रीनाथ जाधव, सुरेश जाधव, मधुकरराव टेके, रावसाहेब टेके, बाबासाहेब शिंदे, माजी पंचायत समिती सदस्य अशोकराव कानडे गोकुळचंद सात्राळकर सोमैय्या शाळेच्या मुख्याध्यापिका सुनिता पारे सोमय्या व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य, पालक समितीसह सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आदींनी अभिनंदन केले आहे.

COMMENTS