Homeताज्या बातम्या

वारकर्‍याला वाचवण्याच्या प्रयत्नात कार पलटी; दाम्पत्याचा जागीच अंत

तासगाव / प्रतिनिधी : नागज, (जि. सांगली) येथे दिंडीतून निघालेल्या वारकर्‍याला वाचवण्याच्या प्रयत्नात भरधाव निघालेली कार ढिगार्‍यावर जाऊन पलटी झाली

माण तालुक्यातील मागील पाणी टंचाईतील टँकरची बिले थकली
सातार्‍यातील महिला सुरक्षा पथदर्शी उपक्रमाची आता राज्यभरात अंमलबजावणी : गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या प्रयत्नांना यश
राष्ट्रीय लोकअदालतीला जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद; 13 हजार 177 प्रकरणे निकाली

तासगाव / प्रतिनिधी : नागज, (जि. सांगली) येथे दिंडीतून निघालेल्या वारकर्‍याला वाचवण्याच्या प्रयत्नात भरधाव निघालेली कार ढिगार्‍यावर जाऊन पलटी झाली. यात पृथ्वीराज चव्हाण व प्रियांका पृथ्वीराज चव्हाण (रा. कसबे डिग्रज) या दांपत्याचा जागीच मृत्यू झाला. तसेच कारमधील आणखी चारजण जखमी झाले आहेत. ही घटना मंगळवारी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय मार्गावर कवठेमहांकाळ तालुक्यातील विठ्ठलवाडी गावाजवळ घडली. सांगलीहून बीडला नातेवाईकांकडे जाताना काळाने त्यांच्यावर घाला घातला. चव्हाण कुटुंबीय (केए23 एन 7074) ने बीडला नातेवाईकांकडे निघाले होते.
दरम्यान, विठ्ठलवाडीजवळ पंढरपूरला निघालेल्या दिंडीतील वारकरी भरधाव कारच्या आडवा आल्याने त्याला वाचवण्यासाठी कारचालकाने कार रस्त्यावरील ढिगार्‍यावर घातली. भरधाव कार ढिगार्‍यावरून पंधरा फूट उडून पुढे रस्त्यावर पलटी झाली. अपघातात कार चक्काचूर झाली. पृथ्वीराज चव्हाण व प्रियांका चव्हाण या दांम्पत्याचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात आणखी चारजण जखमी झाले आहेत. कवठेमहांकाळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे यांनी घटनास्थळास भेट दिली.

COMMENTS