Homeताज्या बातम्या

मुंबई-पुणे कनेक्टिंग लिंकवर दरड कोसळलीसार्वजनिक बांधकाम मंत्र्यांकडून घटनास्थळाची पाहणी

मुंबई/पुणे : मुंबई-पुणे महामार्गावरील कनेक्टिंग लिंकच्या प्रवेशद्वाराजवळ दरड कोसळल्याच्या घटनेनंतर सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसल

आंबेनळी घाट 31 जुलैपर्यंत वाहतुकीसाठी पूर्णपणे बंददरडी आणि भूस्खलनाच्या धोक्यामुळे प्रशासनाचा निर्णय
नवनीत काँवत यांच्या प्रेरणेने नव्या पोलीस पाटलांचा जनसेवेचा निर्धार..!बीडच्या नव्या पोलीस पाटलांना कर्तव्य, जबाबदारी आणि जनसेवेचे प्रेरणादायी मार्गदर्शन700 हून अधिक पोलीस पाटलांचा उत्स्फूर्त सहभाग
पहलगाममध्ये ढगफुटी; उत्तराखंडमध्ये भूस्खलन


मुंबई/पुणे : मुंबई-पुणे महामार्गावरील कनेक्टिंग लिंकच्या प्रवेशद्वाराजवळ दरड कोसळल्याच्या घटनेनंतर सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सोमवारी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी, पोलीस प्रशासन आणि संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर मंत्री भोसले यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे डोंगरावरील पाण्याच्या प्रवाहात अचानक बदल झाला. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर माती, दगड आणि खडक घसरून खाली आले. याच कारणामुळे प्रवेशद्वाराजवळील काही संरक्षक भागाचे नुकसान झाले. त्यांनी स्पष्ट केले की, या घटनेमुळे जोडमार्गातील बोगद्याला कोणत्याही प्रकारची संरचनात्मक हानी झालेली नाही. मात्र, प्रवेशद्वार परिसरातील पाण्याचा निचरा करण्यासाठी उभारण्यात आलेल्या सिमेंटच्या आच्छादनाचा काही भाग तसेच संरक्षण भिंतीचा काही भाग कोसळला आहे. त्यामुळे त्या परिसरात तातडीने सुरक्षिततेच्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत. मुसळधार पाऊस आणि दाट धुक्यामुळे डोंगरमाथ्यावरील स्थितीचे अचूक निरीक्षण करणे सध्या शक्य नसल्याचेही त्यांनी सांगितले. पावसाचा जोर कमी झाल्यानंतर भूगर्भ, स्थापत्य आणि जलनियोजन क्षेत्रातील तज्ज्ञांकडून संपूर्ण परिसराची तांत्रिक तपासणी करण्यात येणार आहे. या तपासणीत पाण्याच्या प्रवाहात बदल होण्यामागील कारणांचा शोध घेतला जाईल. तसेच भविष्यात अशा प्रकारच्या दरडी कोसळण्याच्या घटना टाळण्यासाठी आवश्यक असलेल्या कायमस्वरूपी उपाययोजना निश्‍चित करण्यात येतील. आवश्यक तेथे अतिरिक्त संरक्षण भिंती, सुधारित जलनिस्सारण व्यवस्था आणि उतार स्थिर करण्यासाठी तांत्रिक उपायांचा अवलंब करण्याबाबतही निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

COMMENTS