Homeताज्या बातम्या

 श्रीराम मंदिरातील घटनेची समितीद्वारे चौकशी : गोविंददेवगिरी

श्रीरामपूर : आयोध्या येथील श्रीराम मंदिरात काही दिवसापूर्वी घडलेली घटना दुःखद व वेदनादायी आहे. सदर घटनेने सगळेच अस्वस्थ झाले आहेत. या घटनेच्या तपासासाठी विशेष चौकशी समिती नेमली असून न्यायपूर्ण चौकशी करून रामभक्तांना दिलासा देण्यासाठी विश्वस्त मंडळ कटिबद्ध असल्याचे आश्वासन  श्रीराम मंदिर न्यासाचे कोषाध्यक्ष गोविंददेवगिरी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिले आहे.प्रसिद्धी पत्रकात श्रीराम मंदिरात काही दिवसापूर्वी घडलेल्या दुर्दैवी घटनेबद्दल खेद व्यक्त केला आहे. या घटनेमुळे रामभक्तांना धक्का बसला आहे. या घटनेची नैतिक जबाबदारी स्वीकारून श्रीराम मंदिराचे विश्वस्त श्री. चंपतरायजी व श्री. अनिल मिश्राजी यांनी राजीनामा दिला आहे.या संदर्भात विश्वस्त मंडळाच्या बैठकीत विचार विनिमय केला जाईल.सदर घटनेच्या चौकशीसाठी उत्तरप्रदेश सरकारने विशेष चौकशी समिती गठीत केली असून या समितीद्वारे कसून चौकशी करून सत्य समोर येईल. या समितीच्या अहवालच्या आधारे एफआरआय दाखल केला गेला असून पुढील कार्यवाही केली जात आहे. त्यामुळे कोणत्याही अफवावर विश्वास ठेवू नये तसेच रामभक्तांनी संयम राखवा असे आवाहन गुरुगोविंददेवगिरी यांनी केले आहे.

अखेर उद्धवजींना रामाची आठवण झाली : मुख्यमंत्री फडणवीस
उद्धव ठाकरे करणार रामरक्षा आंदोलनराम मंदिरातील कथित देणगी चोरीवरून आक्रमक
श्रद्धेच्या तिजोरीवरचा दरोडा!

COMMENTS